लंडन : क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिली मॅच खेळवली जात आहे. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमला याला विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. या मॅचमध्ये हाशीम आमलाने ९० रन केल्या तर तो इतिहास घडवेल. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ८ हजार रन पूर्ण करण्याचा रेकॉर्ड हाशीम आमलाच्या नावावर होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये हाशीम आमलाला ९० रन करता आल्या नाहीत तरी त्याला हा विक्रम करण्यासाठी ३ संधी मिळणार आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहलीने १७५ वनडे इनिंगमध्ये ८ हजार रन पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेच्याच एबी डिव्हिलियर्सला ८ हजार रन पूर्ण करण्यासाठी १८२ इनिंग लागल्या. या यादीमध्ये सौरव गांगुली तिसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने ८ हजार रन २०० वनडे इनिंगमध्ये पूर्ण केल्या. सचिनला हे रेकॉर्ड करण्यासाठी २१० आणि ब्रायन लाराला २११ मॅच लागल्या.


हाशीम आमलाने १७१ इनिंगमध्ये ७,९१० रन केले आहेत. २०१७ साली हाशीम आमलाची कामगिरी खराब राहिली. १५ ऑक्टोबर २०१७ साली आमलाने बांगलादेशविरुद्ध ११० रन केले होते. यानंतरच्या १७ इनिंगमध्ये अमलाला फक्त ४ अर्धशतकं करता आली. १९ जानेवारीला पाकिस्तानविरुद्ध अमलाने नाबाद १०८ रनची खेळी केली होती. हे त्याचं शेवटचं शतक होतं.


हाशीम आमलाने ४९.७४ च्या सरासरीने रन केले आहेत, यामध्ये २७ शतकं आणि ३७ अर्धशतकांचा समावेश आहे.