साउथम्पटन : वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्धच्या मॅचआधी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला मोठा धक्का लागला आहे. फास्ट बॉलर डेल स्टेन दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. स्टेनऐवजी दक्षिण आफ्रिकेने डावखुरा फास्ट बॉलर ब्युरन हेन्ड्रिक्सची निवड केली आहे. डेल स्टेनच्या खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण या शस्त्रक्रियेनंतरही स्टेन फिट झाला नाही, त्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागला आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १०४ रननी आणि दुसऱ्या मॅचमध्ये बांगलादेशने २१ रननी पराभव केला. आता तिसऱ्या मॅचआधी दक्षिण आफ्रिकेला स्टेनच्या रुपात आणखी एक झटका लागला आहे.


ब्युरन हेन्ड्रिक्सने २५ जानेवारी २०१९ साली पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमधून वनडेमध्ये पदार्पण केलं. २ वनडेमध्ये हेन्ड्रिक्सने ८१ ची सरासरी आणि ५.०६ च्या इकोनॉमी रेटने १ विकेट घेतली आहे. हेन्ड्रिक्सकडे १४० किमी प्रती तासापेक्षा जास्त जलद बॉल टाकण्याची आणि दोन्ही बाजूंनी बॉल स्विंग करण्याची क्षमता आहे.


वर्ल्ड कपदरम्यान दुखापत झालेल्या खेळाडूऐवजी बदली खेळाडूची निवड करण्यात आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीची परवानगी लागते. या कमिटीने स्टेनऐवजी हेन्ड्रिक्सच्या निवडीला हिरवा कंदील दिला आहे.