मॅनचेस्टर : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एक विक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २० हजार रनचा टप्पा गाठणारा विराट पहिलाच खेळाडू ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने हे रेकॉर्ड केलं. या मॅचमध्ये विराटला २० हजार रनचा टप्पा गाठण्यासाठी विराटला ३७ रनची गरज होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो १२वा खेळाडू आणि तिसरा भारतीय आहे. विराटच्या नावावर वनडेमध्ये ११,१००पेक्षा जास्त रन तर टेस्टमध्ये ६ हजार ६१३ आणि टी-२० मध्ये २ हजार २६३ रन आहेत. सचिन आणि लाराने ४५३ इनिंगमध्ये २० हजार रन केले होते. तर कोहलीने ४१७व्या इनिंगमध्ये २० हजार रन पूर्ण केले.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. पण रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागल्यानंतर विराटने राहुलच्या मदतीने डाव सावरला. पण केएल राहुल हा पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून माघारी परतला. ६४ बॉलमध्ये ४८ रन करुन राहुल आऊट झाला.