ICC World Cup 2023: एकामागून एक सुरु असणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये आता सर्वात मोठी स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ही स्पर्धा म्हणजे क्रिकेट विश्वचषकाची अर्थात आयसीसी वर्ल्डकप 2023 ची. 5 ऑक्टोबरपासून भारतात क्रिकेटच्या एकदिवसीय वर्ल्डकपचीसुरुवात होणार असून, आता या स्पर्धेत सहभागी देशांनी आपआपल्या परिनं तयारी सुरु केली आहे. काही देशांनी संघही घोषित केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार जवळपास 7 देशांनी वर्ल्डकपसाठीच्या संघांची घोषणा केली आहे. त्यामुळं आता विरोधी संघात नेमकं कोण आपल्यासाठी घातक ठरू शकेल याचीच खेळाडूंना कल्पना येत आहे. खेळाडूंची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. पण, याच उत्सुकतेत एक अशी माहिती समोर आली आहे, जी येणं अपेक्षित नव्हतं. किंबहुना या माहितीमुळं क्रिकेटप्रेमींचा हिरमोडही होऊ शकतो. 


वर्ल्डकपआधी हे काय झालं? 


क्रिकेट वर्ल्डकपसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच एक आघाडीचा खेळाडू या स्पर्धेला मुकणार असल्याचं कळत आहे. दुखापतीच्या कारणामुळं त्याला नाईलाजानं स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागत आहे. त्यामुळं संघातील गोलंदाजांची फळीही काहीशी कमकुवत होऊ शकते. वर्ल्डकपाधीच धक्का लागलेला हा संघ आहे दक्षिण आफ्रिका आणि त्या खेळाडूचं नाव आहे एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje). 


Anrich Nortje हा संघातील वेगवान गोलंदाज असून, त्याचा सहभाग संघातील 15 खेळाडूंमध्ये करण्यात आला होता. पण, तो सध्याच सुरु असणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरोधातील पाच सामन्यांच्या मालिकेतही व्यवस्थित खेळू शकला नाही. अवघ्या एकाच सामन्यात खेळणं त्याला शक्य झालं. कमरेच्या दुखापतीमुळं सध्या एनरिचला बऱ्याच अडचणी येत असल्यामुळं आता तो वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेलाही मुकणार आहे. 


हेसुद्धा वाचा : Virat Kohli : '...तर मी आज टीम इंडियामध्ये नसतो', चिमुकल्याच्या DM वर विराटने मन जिंकलं राव; पाहा Video


 


23 सप्टेंबरला दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतासाठी रवाना होणार आहे.  त्यामुळं एनरिचच्या जागी आता संघात दुसऱ्या खेळाडूची वर्णी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्याजागी संघात एंडिले फेलुकवायोला संधी दिली जाऊ शकते. 2019 मध्येही एनरिचला दुखापतीमुळं वर्ल्डकपमध्ये खेळता आलं नव्हतं आणि आतासुद्धा त्याला याच कारणामुळं स्पर्धेतून बाहेर पडावं लागत आहे. नशीब खराब असणं म्हणजे काय ते हेच का? असंच आता क्रिकेटप्रेमी म्हणू लागले आहेत.