Ramiz Raja On Pakistan Cricket Team : आशिया कपमधील कामगिरीनंतर पाकिस्तानचा संघ भारतातील वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) चांगली कामगिरी करेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, पाकिस्तान संघाने फॅन्सला निराश केलंय. पाकिस्तानी खेळाडूंनी सुमार कामगिरीचं प्रदर्शन केलं अन् सेमीफायनल गाठण्याचं (Semifinal qualification scenario) समीकरण अवघड केलंय. पाकिस्तानला वर्ल्ड कपमधील झालेल्या 4 सामन्यांपैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये (Pakistan National Cricket Team) सध्या नाराजीचं वातावरण पहायला मिळत आहे. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांनी बाबर अँड कंपनीला झाप झाप झापलं, त्याचबरोबर तंबी देखील दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा यांनी एका युट्युब वर बोलताना बाबर आझम आणि पाकिस्तान संघाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कॅच सोडण्याची शिक्षा सध्या पाकिस्तानला भोगावी लागत आहे. मागील चारही सामन्यात पाकिस्तानची फिल्डिंग चिंतेचा विषय राहिली आहे. एक कॅच सोडण्याची शिक्षा पाकिस्तानला भोगावी लागत आहे. एका कॅचमुळे तुम्हाला दीशडे धावांचा फटका बसतोय. पाकिस्तान संघाला जागं करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही कॅच पकडत नाही. तोपर्यंत तुम्हाला शिक्षा मिळत राहणार, असं रमीझ राजा म्हणाले आहेत.


आणखी वाचा - World Cup 2023 : टीम इंडियाच्या विजयाने बदललं Points Table चं गणित; पाहा कसं मिळेल सेमीफायनलचं तिकीट?


रमीझ राजा यांनी यावेळी अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयासाठी देखील सल्ला दिला आहे. अफगाणिस्तानचे फिरकी गोलंदाज चेन्नईमध्ये पाकिस्तानला विजयी होण्यात मोठा अडथळा ठरू शकतात, असं रमीझ राजा म्हणतात. योग्य वेळी चांगले शॉट्स खेळले तर विजयाची आशा आहे अन्यथा पाकिस्तानला आपले स्थान टिकवून ठेवणं खूप कठीण होईल, असं रमीझ राजा म्हणाले आहेत.


पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, उसामा मीर, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ.


अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (C), अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल, मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.