World Cup 2023 : टीम इंडियाच्या विजयाने बदललं Points Table चं गणित; पाहा कसं मिळेल सेमीफायनलचं तिकीट?

Semifinal qualification scenario : न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया अंकतालिकेच्या अव्वल स्थानी (India jumps to top in World Cup 2023 Points Table) पोहोचली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचं सेमीफायनलचं गणित सोपं झालंय. कसं ते पाहुया...

Updated: Oct 23, 2023, 12:26 AM IST
World Cup 2023 : टीम इंडियाच्या विजयाने बदललं Points Table चं गणित; पाहा कसं मिळेल सेमीफायनलचं तिकीट? title=
India jumps to top After in World Cup 2023 Points Table

India vs New zealand : तब्बल 20 वर्षानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करून किवींचा विजयरथ रोखला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) न्यूझीलंडने पहिल्या पराभवाची चव चाखली. टीम इंडियाने दणदणीत 4 गडी राखून विजय मिळवला अन् अंकतालिकेत (World Cup Points Table) देखील टीम इंडियाने बाजी मारली आहे. 10 गुणांसह टीम इंडियाने अव्वल स्थानी आहे. तर न्यूझीलंड 4 विजयासह 8 अंकावर आहे. तर साऊथ अफ्रिका तगड्या रनरेटसह तिसऱ्या स्थानी काम आहे. त्याचबरोबर पराभवातून रस्ता काढत ऑस्ट्रेलियाने चौथं स्थान गाठलंय. न्यूझीलंडविरुद्धच्या विजयामुळे आता टीम इंडियाचं सेमीफायनलचं (Semifinal qualification scenario) गणित देखील सोपं झालंय.

कसं असेल सेमीफायनलचं गणित?

न्यूझीलंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया ही तिन्ही प्रमुख आव्हानं टीम इंडियाने पार केली आहेत. त्यामुळे आता उरलं इंग्लंड आणि साऊथ अफ्रिका... इंग्लंडची परिस्थिती पाहता, भारतासमोर इंग्लंड तगडं आव्हान देऊ शकत नाही, अशी शक्यता आहे. मात्र, डिफेन्डिंग चॅम्पियनला हलक्यात घेणं धोक्याचं ठरेल. तर दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा 5 नोव्हेंबरचा सामना वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. टीम इंडियाकडे आता 10 पॉइंट्स आहेत. सेमीफायनल गाठण्यासाठी कमीतकमी 14 पॉइंट्सची गरज असेल. त्यामुळे आता नेदरलँड आणि श्रीलंका या दोन लिंबुटिंबू संघांविरुद्ध जिंकलं तरी टीम इंडियाचं सेमीफायनल तिकीट पक्कं होऊन जाईल. मात्र, सर्व सामने जिंकण्याचा मानस टीम इंडियाचं असेल.

टीम इंडियाच्या आगामी सामन्याचं वेळापत्रक

29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.

टीम इंडियाचा आत्तापर्यंतचा प्रवास

दरम्यान, 8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलियाविरुद्घ चेन्नईत भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ 8 गडी राखून विजयी झाला होता. तर पाकिस्तानविरुद्ध 14 ऑक्टोबरला 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्याचबरोबर 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशला 7 विकेट्सने लोळवलं होतं. तर 20 वर्षानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडला धुळ चारून विजयाचा पंचनामा केलाय. त्यानंतर आता गोऱ्या साहेबांना पाणी पाजण्यासाठी टीम इंडिया तयार असेल.