World Cup 2023 Gautam Gambhir On Virat Kohli: वर्ल्ड कप 2023 मध्ये विराट कोहलीने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे विराटच्या कामगिरीचा फायदा भारताला झाला असून आतापर्यंतच्या 5 ही सामन्यांमध्ये भारताने धावांचा पाठलाग करत सामने जिंकले आहेत. विराटने  सामन्यांमध्ये 3 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावत 354 धावा केल्या आहेत. विराट कोहली हा वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. विराटची धावांची सरासरी 118 इतकी आहे. भारताने रविवारी न्यूझीलंडविरुद्धचा सामना 4 विकेट्स राखून जिंकला. या सामन्यामध्ये विराटने 95 धावांची खेळी केली.


गौतम गंभीर काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 5 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शामीला प्लेअर ऑफ द मॅच घोषित करण्यात आलं. पाहुण्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 273 धावा केल्या. भारताने हे लक्ष्य 48 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून गाठलं. विराटला शतकासाठी 5 धावा हव्या असताना तो षटकार मारण्याचा नादात झेलबाद झाला. मात्र विराटने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती पाहून अनेकांनी विराट हा सर्वोत्तम फिनिशर आहे असं म्हटलं आहे. मात्र या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने विराटला तुम्ही फिनिशर नाही म्हणू शकत असं म्हटलं आहे. अनेकदा 11 व्या क्रमाकांचा खेळाडूही विजय मिळवून देतो असंही गंभीर म्हणाला आहे.


विराट सामना जिंकवण्यासाठी...


भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना गौतम गंभीरने सलामीवीरही फिनिशर होऊ शकतो असं म्हटलं आहे. विजयासाठी आवश्यक असणारी धाव जो काढतो तो फिनिशर असतो असं मत गंभीरने व्यक्त केलं. त्यामुळे तिसऱ्या, चौथ्या किंवा त्या खालील क्रमांकाच्या फलंदाजालाही फिनिशर म्हणून शकतो. विराटवर कौतुकाचा वर्षाव करताना गंभीरने, "विराट कोहली हा मास्टर चेसर आहे. तो सामना जिंकवण्यासाठी अगदी शेवटपर्यंत खेळपट्टीवर असतो," असं म्हटलं आहे. विराटने वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघ 2 वर 3 बाद अशा स्थितीत असताना 85 धावा करत के. एल. राहुलच्या मदतीने संघाला विजय मिळवून दिला होता.


मॉर्डन क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडू


भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनेही विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विराट कोहलीमध्ये अगदी पहिल्या दिवसापासूनच धावांचा पाठलाग करण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द दिसून येतो. आपल्या समोर टार्गेट असेल तर आपल्याला फलंदाजी करणं अधिक सोपं जातं असं विराट कोहली सांगतो असा संदर्भही हरभजनने दिला. समोर टार्गेट असेल तर विराट त्याप्रमाणे डावाला आकार देतो, असंही हरभजन म्हणाला. संजय मांजरेकर यांनी विराट कोहली हा मॉर्डन क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडूंपैकी एक असल्याचं सांगताना तो सामना संपल्यानंतरच शांत होतो, असंही म्हटलं आहे.