World Cup : क्रिकेटचा सामना हा फक्त आणि फक्त खेळापुरताच मर्यादित राहत नाही, तर या सामन्यामध्ये असेही काही क्षण पाहायला मिळतात ज्याचीच अधिक चर्चा होते. भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांमध्ये वर्ल्ड कपमधील 33 व्या सामन्यामध्ये असंच चित्र पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेपुढं उभा ठाकला आणि संघानं धावांचा डोंगर उभा केला. 302 धावांनी लंकेवर मात करत भारतीय क्रिकेट संघानं थेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्येच धडक मारली. या सामन्यामध्ये विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर हे खेळाडू विशेष चमकले. विराटचंच सांगावं, तर या स्पर्धेमध्ये त्याची सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली आहे. जिथं त्यानं श्रीलंकेविरोधातही दमदार कामगिरी करत 88 धावा केल्या. 


हेसुद्धा वाचा : सलग 7 व्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा प्रचंड आनंदी, ‘या’ खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय


एकिकडे खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना धडकी भरवत असतानाच विराटनं दुसरीकडे वानखेडेवर त्याचं Entertainer रुपही सर्वांपुढे आणलं. या सान्यातील त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, जिथं विराट चक्क भर मैदानात मनसोक्त Dance करताा दिसला. 




विराटचा धमाकेदार परफॉर्मन्स 


श्रीलंकेविरोधातील सामन्यात भारताची गोलंदाजी सुरु असताना, मध्येच 'माय नेम इज लखन' गाणं स्टेडियममध्ये वाजू लागलं. बस्स, मग काय? तिथं क्रिकेटप्रेमींनी या गाण्यावर कल्ला करण्यास सुरुवात केली आणि तिथं मैदानात विराटही स्वत:ला थांबवू शकला नाही. मोठ्या उत्साहात त्यानं या गाण्यावर ठेका धरत अनिल कपूर यांची गाजलेली स्टेप केली आणि क्रिकेट रसिकांनी विराटच्या या परफॉर्मन्सलाही उत्स्फूर्त दाद दिली. फक्त सामन्यातच नव्हे, तर सामना सुरु होण्याच्या आधीही विराट काहीशा अशाच अंदाजात दिसला. खेळाचा ताण एकिकडे आणि आनंदाचे क्षण एकिकडे हे असंच काहीसं विराटच्या बाबतीत यावेळी पाहायला मिळालं.