भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने श्रीलंकेविरोधातील सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये वर्षभरात 1000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. 50 ओव्हर्स क्रिकेटमध्ये  विराटच्या आधी शुभमन गिल, रोहित शर्मा आणि पथुम निसांका यांनी हा रेकॉर्ड केला असून चौथा आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने आपल्या 23 व्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली आहे. यासह विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा 1000 धावांचा रेकॉर्ड मोडला आहे. विराट कोहलीने कॅलेंडर वर्षात आतापर्यंत 8 वेळा हा रेकॉर्ड केला आहे. 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019 आणि 2023 या वर्षांमध्ये विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे. 


सचिन तेंडुलकरने सात वेळा 1000 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. 1994, 1996, 1997, 1998, 2000, 2003 आणि 2007 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती. श्रीलंकेविरोधातील सामना सुरु होण्याआधी विराट कोहलीला हा रेकॉर्ड करण्यासाठी 34 धावांची गरज होती. मुंबईतील वानखेडे मैदानात हा सामना सुरु असून विराटने यावेळी हा रेकॉर्ड केला.


लखनऊनमध्ये इंग्लंडविरोधातील सामन्यात विराट कोहली एकही धाव करु शकला नव्हता. विराट कोहली शून्यावर बाद झाला असला, तरी उर्वरित स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. पुण्यात बांगलादेशविरोधात झालेल्या सामन्यात विराट कोहली नाबाद राहिला होता. तसंच न्यूझीलंडविरोधात त्याने 95 धावा ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता. 


कोहलीने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्धही अर्धशतकं झळकावली होती. अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 26000 धावा पूर्ण करणारा विराट सचिन, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंगनंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे.