World Cup 2023 : T20 वर्ल्डकपनंतर (T20 World cup) आता पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या ICC वनडे वर्ल्डकप (World Cup 2023) संदर्भात आता चर्चा रंगू लागल्या आहेत. येणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये एकूण 10 टीम्सचा (10 cricket teams) समावेश असणार आहे. ज्यासाठी होस्ट असल्याने टीम इंडिया सकट 7 टीम क्वालिफाय (7 cricket teams qualify) करण्यात आल्या आहेत. गेल्या 2 वर्षांमध्ये भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) या दोन्ही टीम वर्ल्डकपमध्ये एकाच ग्रुपमध्ये होत्या. त्यामुळे आता आगामी 2023 च्या वर्ल्डकपमध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असणार का, हा चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे.


भारत आणि पाकिस्तान पुन्हा एका ग्रुपमध्ये येणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये इंग्लंडमध्ये आयसीसी वर्ल्डकपच आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये लीग राऊंडमध्ये 10 टीम्सने सहभाग घेतला होता. त्यावेळी एका टीमने सर्व टीम्ससोबत एक-एक सामना खेळला होता. तसंच 9 सामन्यांनंतर टेबलमध्ये टॉप 4 असलेल्या टीम्सना सेमीफायनलमध्ये स्थान दिलं होतं. 2019 मध्ये झालेल्या फायनलमध्ये इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये बाऊंड्री काऊंट नियमाने विश्वविजेता घोषित केला होता.


गेल्या वर्षीच्या वर्ल्डकपप्रमाणे World Cup 2023 मध्ये भारत-पाकिस्तान लीग राऊंडच्या माध्यमातून पुन्हा एकमेकांसमोर मैदानात उतरू शकतात. भारत-पाकिस्तान वनडे आणि T20 वर्ल्डकपमध्ये एकूण 3 वेळा एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये भारताचा 2 वेळा तर पाकिस्तानचा 1 वेळा विजय झाला आहे.


World Cup 2023 कोणत्या टीमने केलं क्वालीफाय?


आयसीसी वर्ल्डकप 2023 (World Cup 2023) साठी भारत (Team India), इंग्लंड, न्यूजीलंड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगानिस्तान या टीम्सने क्वालिफाई केलं आहे. वर्ल्डकप सुपर लीगच्या प्वाइंट टेबलवर नजर टाकली तर टीम इंडिया नंबर-1 वर आहे. यामध्ये भारताचे एकूण 134 पॉईंट्स आहेत तर इंग्लंडचे 125 पॉईंट्स असून ती दुसऱ्या क्रमांकावर आहे.


न्यूझीलंडचे 125 पॉईंट्स आहेत, मात्र नेट रनरेट कमी असल्यामुळे त्यांना तिसरं स्थान मिळालंय. ऑस्ट्रेलिया 120 पॉईंट्सवर चौथ्या, बांग्लादेश 120 पॉईंट्सवर पाचव्या, पाकिस्तान 120 पॉईंट्सवर सहाव्या आणि अफगाणिस्तान 115 पॉईंट्सवर सातव्या क्रमांकावर आहे. दरम्यान दक्षिण अफ्रीका, वेस्टइंडीज आणि श्रीलंकेने अजून यामध्ये क्वालिफाय केलं नाही.