Umpire Does Not Give Wide: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या संघातील फलंदाजीचा कणा असलेल्या विराट कोहलीने त्याला चेस मास्टर का म्हणतात हे गुरुवारी पुन्हा एकदा सिद्ध केलं. कोहलीने 48 वं शतक झळकावलं. विराटच्या या शतकासहीत भारताने यंदाच्या वर्ल्ड कपमधील सलग चौथा विजय मिळवला. भारतीय संघाने 257 धावांचं टार्गेच 41.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. विराटने एकदिवसीय क्रिकेटमधील आपलं 48 वं तर अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 78 वं शतक झळकावलं. मात्र विराटने हे शतक झळकावण्यासाठी चांगलची झुंज दिली ती गोलंदाजांशी नव्हते तर परिस्थितीशी. 80 वरुन 100 धावांपर्यंतचा विराटचा प्रवास फारच रंजक राहिला. या दरम्यान पंच रिचर्ड केटलब्रो (Richard Kettleborough) यांनी दिलेल्या एका निर्णयाचीही सोशल मीडियावर तुफान चर्चा आहेत. त्यातच या पंचांचं महेंद्र सिंग धोनी कनेक्शनही समोर आलं आहे.


जितक्या धावा विजयाला तितक्याच शतकासाठी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीला शतकासाठी जितक्या धावा हव्या होत्या तितक्याच धावा भारताला विजयासाठी हव्या होत्या. अगदी 20 धावा शिल्लक असल्यापासून हे समीकरण असेच होते. त्यामुळेच शेवटची काही षटकं विराटनेच खेळून काढली. के. एल. राहुलने यापैकी एकही धाव केली नाही. विराटचं शतक व्हावं यासाठी के. एल. राहुलने हा अनोखा त्याग केला. मात्र सर्व काही सुरळीत सुरु असताना विराट 97 धावांवर फलंदाजी करताना एक गोंधळ झाला. भारताला विजयासाठी 2 धावांची गरज होती. विराटचा चौकार मारुन आपलं शतक पूर्ण करायचं होतं. सामन्यातील 42 ओव्हर बांगलादेशचा फिरकी गोलंदाज नसुम अहमदने टाकली. या ओव्हरचा पहिलाच चेंडू नसुमने लेग साइडला टाकला आणि तो विराटच्या पाया मागून केला. हा चेंडू वाईड होता. हा बॉल पाहून भारतीय ड्रेसिंग रुममधील अनेक खेळाडू आश्चर्यचकित झाले.


पंच वाईड घोषित करणार असं वाटत होतं पण...


आता पंच रिचर्ड केटलब्रो हात लांबवून चेंडू वाईड घोषित करणार असं वाटत होतं. हा बॉल पायामागून जाऊन विकेटकिपरच्या हातात स्थिरावल्यानंतर विराटचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. मात्र पंच रिचर्ड केटलब्रो यांनी हा चेंडू वाईट घोषित केला नाही. चेंडू टाकल्यानंतर पंच रिचर्ड केटलब्रो यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही मात्र त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आलं. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर विराटने एकही धाव काढली नाही. तिसऱ्या चेंडूवर डीप मिडविकेटवरुन विराटने फ्लॅट सिक्स लगावत भारताच्या विजयावर आणि आपल्या शतकावर शिक्कामोर्तब केलं अन् चाहत्यांचं एकच सेलिब्रेशन सुरु झालं.


त्या सामन्यामुळेच चर्चेत आलेले हेच पंच


रिचर्ड केटलब्रोच्या या निर्णयाचा भारतीय चाहत्यांनी कौतुक केलं आहे. नसुम अहमदने मुद्दाम वाईड चेंडू टाकला होता. पण पंचांनी त्याचा डाव हाणून पाडला असं भारतीय चाहत्यांनी म्हटलं आहे. अनेकांनी रिचर्ड केटलब्रो देव माणूस असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे भारतीय सामन्यामुळे रिचर्ड केटलब्रो चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 साली झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान मोक्याच्या क्षणी महेंद्र सिंग धोनी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्न डायरेक्ट थ्रोमुळे धावबाद झाला त्यावेळी लेग अंपायर म्हणून रिचर्ड केटलब्रोच उभे होते. थेट स्टम्पवर चेंडू लागल्याने रिचर्ड केटलब्रो यांच्या चेहऱ्यावरील हावभाव व्हायरल झाले होते.



भारतीय संघाचा हा सलग चौथा विजय असून या विजयासहीत भारत पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.