द्रविडला मिळाली दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठीची Tip; टीम इंडिया हॉटेलमध्ये असतानाच...
World Cup 2023 Rahul Dravid Got Tip: वर्ल्ड कप 2023 मध्ये India vs South Africa दरम्यान महत्त्वाचा सामना होणार असून त्यापूर्वीही प्रशिक्षक राहुल द्रविडला एक महत्त्वाची माहिती मिळाली असून ती भारतासाठी फायद्याची ठरु शकते.
World Cup 2023 Rahul Dravid Got Tip: वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ 5 नोव्हेंबर रोजी आपला साखळी फेरीतील आठवा सामना खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील हा सामना क्लॅश ऑफ टायटन्स म्हणजेच पॉइण्ट्स टेबलमधील 2 अव्वल संघाचा सामना ठरणार आहे. सध्या भारतीय संघ अव्वल स्थानी असून दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा सामना सध्या दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळत आहेत ते पाहता फायनल आधीची फायनल म्हणून चर्चेत आहे. आपल्या शेवटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला 302 धावांची धूळ चारली आहे तर दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 190 धावांनी पराभूत केलं आहे.
सर्व खेळाडू थेट हॉटेलमध्ये गेले
भारतीय संघ शुक्रवारी मुंबईहून कोलकात्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी दाखल झाला आहे. भारतीय संघ विमानतळावरुन थेट आयटीसी सोनार हॉटेलमध्ये पोहोचला. भारतीय क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी विमानतळाबरोबरच या हॉटेलबाहेरही चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. भारतीय संघ आज सरावासाठी मैदानात उतरणार आहे.
मात्र द्रविड हॉटेलवर गेला नाही...
संपूर्ण संघ हॉटेलमध्ये गेलेला असतानाच भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड मात्र ईडन गार्डन्सवर गेला होता. द्रविड नेहमीच सामन्याआधी मैदानामधील खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी जातो. पुढील 2 दिवस कोलकात्यामध्ये बिगरमोसमी पावसाची अंदाज व्यक्त करण्यात आल्याने खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी सांयकाळी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. द्रविड जवळपास 20 मिनिटं मैदानामध्ये होता. यावेळेस बीसीसीआयचे पिच समितीचे प्रमुख आशीष बौमिक तसेच बंगाल क्रिकेटचे स्थानिक क्युरेटर सुजन मृखर्जी मैदानामध्ये राहुलबरोबर होते.
नक्की वाचा >> 'दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप जिंकला नाही तर...', डिव्हिलियर्सचं मत; भारतालाही दिला इशारा
द्रविडला मिळाला विजयाचा फॉर्म्युला?
बंगाल क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी राहुल द्रविडला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाची एक टीप दिली आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी केल्यास या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारता येईल असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता त्यांचं म्हणणं द्रविड आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऐकतो का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. द्रविडने कोलकात्यामध्ये पोहचल्यानंतर मैदानाला भेट दिल्याने त्याला हा भारतीय संघाच्या विजयाचा फॉर्म्युलाच सापडला आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे. भारत आता टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणार का याचं उत्तर उद्याच मिळेल.
नक्की वाचा >> दक्षिण आफ्रिकेनं भारताला डिवचलं! म्हणाले, 'आम्ही भारताला भारतातच...'
उत्तम सामना होणार
मुखर्जी यांनी, "द्रविड खेळपट्टी पाहून समाधानी होता. आम्ही चांगली खेळपट्टी बनवली आहे ज्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत होईल. उत्तम क्रिकेट सामना पाहायला मिळेल," असं म्हटलं आहे. ईडन गार्डनच्या मैदानावर वर्ल्ड कप 2023 मध्ये कोणत्याही संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. मात्र या मैदानावरील खेळपट्टी ही फलंदाजांना मदत करणारी मात्र गोलंदाजांचीही साथ देणारी असल्याचं दिसून आलं आहे.