Video : रबाडा मूळचा नालासोपाऱ्याचा? मुंबई लोकलची खडानखडा माहिती, म्हणतो `बापाला शिकवू नका...!`
ICC Cricket World Cup 2023 : कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवला देखील आश्चर्याचा धक्का बसलाय.
Kagiso Rabada Viral Video : यंदाच्या वर्ल्ड कपला (ICC Cricket World Cup 2023) आता फक्त तीन दिवस बाकी आहेत. सर्व संघ वर्ल्ड कप खेळण्याआधी वॉर्मअप सामने खेळत आहेत. अशातच आता साऊथ अफ्रिकेचा संघ (South Africa Cricket Team) देखील न्यूझीलंडसोबत सराव सामना खेळतोय. अशातच आता वर्ल्ड कपआधी साऊथ अफ्रिकेचा स्टार गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabada) याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ (Viral Video) पाहून टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवला देखील आश्चर्याचा धक्का बसलाय.
न्यूझीलंड आणि साऊथ अफ्रिका (NZ vs SA) यांच्यातील हा सामना पावसामुळे थांबवण्यात आला असला तरी सध्या चर्चा होते, ती अफ्रिकेच्या रबाडाची... कागिसो रबाडाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या हिंदीने सर्वांना आश्चर्यचकित केलंय. रबाडाला आपण आयपीएल खेळताना पाहिलंय. त्यामुळे त्याला हिंदी येत असावी, असं सर्वांना वाटतंय. याचाच नमुना वर्ल्ड कपआधी पहायला मिळालाय. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये रबाडा हिंदी बोलताना दिसतोय. त्याचबरोबर त्याला मुंबई लोकलची माहिती देखील आहे.
सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन सोशल मीडिया स्टार्सला भेटायला येतो आणि त्यांची ओळख करून घेतो. त्यावेळी सोशल मीडिया स्टार्स रबाडा समोर मोठमोठ्या गप्पा मारायला सुरूवात करतात. त्यावर रबाडा या दोघांना क्लिन बोल्ड करतो. त्यावेळी मुंबई लोकल अन् इतर गोष्टींवर चर्चा होते. त्यावेळी रबाडा म्हणतो 'पापा को मत सिखाओ'... त्यानंतर ते रबाडाची मजा घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, रबाडा पुरून उरतो.
पाहा Video
दरम्यान, शेवटी वैतागून दोघंही रबाडाला विचारतात. तू आहेस तरी कुठला? तुला एवढं सगळं कसं काय माहित? त्यावेळी रबाडा नालासोपाऱ्याचं नाव घेतो. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
वर्ल्ड कपसाठी साऊथ अफ्रिकेचा संघ
तेम्बा बावुमा (कॅप्टन), गेराल्ड कोएत्ज़ी, क्विंटन डी कॉक, रीज़ा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, कगिसो रबाडा, तबरेज़ शम्सी, रासी वैन डेर डुसेन, लिजाड विलियम्स.