IND vs NZ : टीम इंडिया दुहेरी संकटात! ईशान आणि सूर्यकुमारही खेळणार नाही सामना? जाणून घ्या कारण
India vs New zealand World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार सुरूवात केलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) उपस्थित असणार नाहीत, अशी माहिती समोर आलीये. त्याचं कारण काय? जाणून घेऊया...
Ishan Kishan and Suryakumar Yadav : वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या चार सामन्यात धमाकेदार अंदाजात विजय मिळवल्यानंतर आता पाचव्या विजयासाठी भारतीय संघ तयार आहे. बांगलादेशविरूद्ध हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya Injury) रुपात टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. तर त्यानंतर रविंद्र जडेजा जखमी झाल्याने भारताला दुखापतीचं ग्रहण लागलं होतं. अशातच आता टीम इंडियाचे दोन स्टार फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूर्या भारताचा थ्रो डाउन स्पेशालिस्ट रघूसोबत सराव करत होता. त्यानंतर त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आणि त्यावर पट्टी बांधल्याचं समोर आलं होतं. तर दुसरीकडे इशान किशनला मधुमाशी चावल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.
कोणाला मिळणार संधी?
हार्दिक पांड्या खेळणार नाही, हे जवळजवळ निश्चित मानलं जातंय. तर रविंद्र जडेजा, सूर्या आणि इशानच्या दुखापतीवर अपडेट आली नाही. जर चारही खेळाडू उपलब्ध नसतील तर आश्विन आणि शार्दुल ठाकूर यांना संघात जागा मिळू शकते.
विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
टीम इंडियाच्या आगामी सामन्याचं वेळापत्रक
22 ऑक्टोबर विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर विरुद्ध श्रीलंका, मुंबई
५ नोव्हेंबर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
12 नोव्हेंबर विरुद्ध नेदरलँड, बेंगळुरू
टीम इंडियाचा आत्तापर्यंतचा प्रवास
दरम्यान, 8 ऑक्टोबर विरुद्ध ऑस्ट्रेलियाविरुद्घ चेन्नईत भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ 8 गडी राखून विजयी झाला होता. तर पाकिस्तानविरुद्ध 14 ऑक्टोबरला 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्याचबरोबर 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशला 7 विकेट्सने लोळवलं होतं. त्यानंतर आता न्यूझीलंडची वेळी आलीये.