Video: सूर्यकुमारसारखा Scoop Shot मारायला गेला अन् बॉल 2 पायांमधून...; आजोबाही वैतागले
World Cup 2023 Joe Root Bowled Video: सलामीला आलेल्या दोन्ही फलंदाजांनी उत्तम सुरुवात करुन दिल्यानंतर अचानक एक अजब फटका मारण्याच्या नादात जो ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून इंग्लंडच्या समर्थकांना कपाळावर हात मारुन घेतला.
World Cup 2023 Joe Root Bowled Video: वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमधील शेवटचे काही सामने शिल्लक असून यंदाच्या पर्वामध्ये विद्यमान विजेता इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा दुसरा संघ ठरला आहे. इंग्लंडची कामगिरी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंग्लंडच्या सुमार कामगिरीमुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. स्पर्धेमध्ये सलग 5 सामने पराभूत झाल्यानंतर इंग्लंडने बुधवारी नेदरलॅण्डला पराभूत केलं. इंग्लंडने नेदरलॅण्डला 160 धावांनी पराभूत केलं. इंग्लंडचा हा स्पर्धेमधील दुसराच विजय ठरला आहे. या सामन्यामध्ये बेन स्ट्रोक्सने शतक झळकावलं. मात्र बेन स्ट्रोक्सच्या दमदार शतकाबरोबरच जो रुट ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहूनही अनेकांनी आश्चर्य वाटलं. जो रुटच्या विकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
इंग्लंडची उत्तम सुरुवात
नेदरलॅण्डविरुद्धच्या सामन्यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकून कर्णधार जॉस बटलरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवर डेव्हीड मिलानने उत्तम खेळी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली. मिलानने केवळ 36 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मिलान आणि जो रुटमध्ये 88 धावांची पार्टनरशीप झाली. जो रुट 28 धावा करुन तंबूत परतला. मात्र जो रुट ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून इंग्लंडच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
अजब पद्धतीने झाला बाद
21 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर जो रुटने लोगान व्हॅन बिकच्या गोलंदाजीवर स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र लोगान व्हॅन बिकचा अखूड टप्प्याच्या बॉलने म्हणावी तितकी उसळी घेतली नाही. स्कूप शॉटसाठी बॉल उसळी घेऊन येईल असा विचार करुन बटलरने दोन्ही पायांच्या मध्ये बॅट पकडून बॉल डोक्यावरुन मागे टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल त्याच्या दोन्ही पायांच्या मधून जात थेट मिडल स्टम्पवर जाऊन आदळला. जो रुट ज्या पद्धतीने बाद झाला ते पाहून पुण्यातील मैदानामध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या एका वयस्कर चाहत्याने कपाळावर हात मारुन घेतला. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
इंग्लंडच्या आशा कायम
इंग्लंडचा सलामीवर डेव्हिड मलानने 81 धावांची खेळी केली. क्रिस वोक्सने खालच्या क्रमांकावर येत अर्धशतक झळकावलं. इंग्लंडच्या संघाने 339 धावांचा डोंगर उभा केला. आदिल रशीद आणि मोइन अली यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेत नेदरलॅण्डच्या संघाला 179 धावांवर तंबूत धाडलं. इंग्लंडच्या या विजयासहीत अव्वल 7 संघांमध्ये राहून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पात्र होण्याच्या आशा कायम आहेत. तर दुसरीकडे या पराभवामुळे नेदरलॅण्ड सेमीफायलन्सच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे.