दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा भारताला बसला मोठा फटका! Points Table पाहून वाटेल आश्चर्य
World Cup 2023 Points Table After Australia vs South Africa Match: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड कप 2023 मधील 10 वा सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने मोठा विजय मिळवला आहे.
World Cup 2023 Points Table After Australia vs South Africa Match: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या वर्ल्डकप 2023 च्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने मोठा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा पराभव ठरला असून दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा विजय ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेने या विजयानंतर पॉइण्ट टेबलमध्ये थेट पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. ही स्पर्धा सुरु झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात इंग्लंडवर मोठा विजय मिळवून पहिल्या स्थानी अबाधित असलेल्या न्यूझीलंडची पहिल्यांदाच पॉइण्ट्स टेबलमध्ये घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा फटका भारतालाही बसला आहे.
सामन्यात नेमकं घडलं काय?
वर्ल्डकपमधील 10 वा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने आपल्या नियोजित 50 ओव्हरमध्ये 311 धावांपर्यंत मजल मारली. क्विंटन डिकॉकने खणखणीत शतक झळकावत संघाला 300+ धावांचा टप्पा गाठण्यासात मोलाची भर घातली. 312 धावांचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियन संघाला पूर्ण 50 ओव्हरही खेळून काढता आल्या नाहीत. 55 चेंडू शिल्लक असतानाच 41 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा 10 वा फलंदाज बाद झाला तेव्हा स्कोअर 177 वर होता. रबाडाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना घाम फोडला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 134 धावांनी जिंकला. वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया 10 संघांच्या यादीमध्ये थेट नवव्या स्थानी फेकला गेला आहे तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
भारतालाही धक्का
दक्षिण आफ्रिकेने मोठ्या फरकाने सामना जिंकल्याने त्यांच्या नेट रन रेटमध्ये मोठी वाढ झाली असून स्पर्धेतील पहिले दोन्ही सामने जिंकून +2.360 नेट रन रेटसहीत पहिल्या स्थानी आहे. न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी घसरला आहे. आज न्यूझीलंडचा सामना बांगलादेशविरुद्ध असून हा सामना जिंकल्यास न्यूझीलंड पुन्हा पहिल्या स्थानी झेप घेऊ शकतो. तर दक्षिण आफ्रिकेच्या या कामगिरीचा फटका भारतालाही बसला आहे. अफगाणिस्ताविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकून भारताने पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतलेली. मात्र 24 तासांच्या आतच भारत तिसऱ्या स्थानी सरकला आहे. पाकिस्तानचा संघ टॉप 4 संघांमध्ये आहे. अव्वल चारही संघाने आपआपले पहिले दोन्ही सामने जिंकलेत.
2 पैकी प्रत्येकी 1 सामना जिंकला
पाचव्या स्थानी इंग्लंड असून सहाव्या स्थानी बांगलादेश आहे. या दोन्ही संघांनी आपल्या 2 पैकी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. श्रीलंका, नेदलॅण्ड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला वर्ल्डकप 2023 च्या स्पर्धेत पहिल्या 10 सामन्यानंतर एकही सामना जिंकता आलेला नाही.
पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यास भारत पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी झेप घेऊ शकतो.