Rachin Ravindra his Indian roots : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (NZ vs AUS) यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय वंशाच्या रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याने दमदार शतक ठोकलं. 89 बॉलमध्ये त्याने 116 धावांची खेळी केली होती. मात्र, 389 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड 5 धावांनी कमी पडली. एकीकडे विकेट्स जात असताना रचिन टिकून खेळला. रचिनची चिवट फलंदाजी पाहून भारतीय फॅन्सने मैदानात रचिन रचिनच्या नावाचा जयजयकार केला. त्यावर त्याने प्रेस कॉन्फरेन्समध्ये (Press Conference) भाष्य केलंय.


काय म्हणाला Rachin Ravindra ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला हा प्रश्न विचारल्यावर मला बरं वाटतं. पण मी 100 टक्के किवी आहे. पण मी भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या आईवडिलांचा जन्म ज्या देशात झाला, ते ज्या देशात वाढले आणि ज्या देशात माझे अनेक नातेवाईक आहेत, तिथं मी शतक करू शकलो याची मला आनंद आहे. मला वाटतं की भारतात फलंदाजीच्या कंडिशन्सन चांगल्या आहेत. मी याआधी दौऱ्यावर भारतात येऊ शकलो आणि माझा खेळ परिपूर्ण न करण्याचा प्रयत्न केला पण मी अधिक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. 


आणखी वाचा - Rachin Ravindra : इंग्लंडला चोपणाऱ्या रचिनचं नाव कसं पडलं?


मला वाटतं की भारतीय क्राऊड हा सर्वोत्तम प्रतिसाद देणारा होता. त्यामुळे आनंद वाटतो. लहानपणी स्वप्न असतं की लोकांनी तुमच्या नावाचा जप करावा. भारतीयांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. माझ्या नावाचा जप असो वा निशमच्या... निशम जेव्हा फलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्या नावाची घोषणा देत होते. तो क्षण सर्वोत्तम असतो. मला वाटतं की हे नेहमीच खास असतं, तुम्ही त्या क्षणांमध्ये नाचत असता आणि आशा आहे की आम्ही त्यांना कधीही गृहीत धरणार नाही, असं रचिन रविंद्र म्हणाला होता.


रचिन नाव कसं पडलं?


इंग्लंडविरुद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात रचिन रवींद्रने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 89 चेंडूत 123 धावा ठोकल्या होत्या. त्यावेळी त्याचं खूप कौतूक झालं होतं. रचिनचे वडिल सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांनी लहानपणापासून सचिन अन् द्रविड यांना खेळताना पाहिलंय. त्यामुळे रचिनच्या वडिलांनी आपल्या मुलाचे नाव राहुलचं 'र' आणि सचिनचं 'चिन' घेत रचिन असं ठेवलं. आपल्या मुलाने क्रिकेट व्हावं अन् सचिन अन् राहुल सारखं खेळावं, असं त्यांना नेहमी वाटायचं. आता त्याचं स्वप्न रचिनने पूर्ण केलंय.