World Cup 2023: यावर्षी होणाऱ्या वर्ल्डकप सामन्यांचे यजमानपद भारताकडे आहे. देशातील विविध राज्यांमध्ये जगभरातून आलेल्या टिम्सचे रोमहर्षक सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत हे सामने खेळवले जातील. सध्या विश्वचषक २०२३ चे क्वालिफायर खेळवले जात आहेत. हा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून सर्वच संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, बीसीसीआयने संजू सॅमसनचा संघात समावेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामागे कॅप्टन रोहीत शर्माचा मोठा गेम प्लान असल्याचे सांगितले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनला टीम इंडियामध्ये स्थान दिले जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. सॅमसनचा भारताच्या 20 सदस्यीय संघात समावेश केला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे. येथे टिम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकाची तयारी पाहता बीसीसीआयने संजू सॅमसनचा वनडे संघात समावेश केला आहे. 


सॅमसनने आपला शेवटचा वनडे सामना 25 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. संजूने 2015 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण त्यानंतर या 9 वर्षांत तो केवळ 11 वनडे आणि 17 टी-20 सामने खेळला आहे.


संजू सॅमसनचा संघात समावेश करण्याचे कारण


एकदिवसीय विश्वचषक हे संजू सॅमसनचा भारतीय संघात समावेश होण्यामागचे सर्वात मोठे कारण आहे. संघाचा मुख्य यष्टीरक्षक ऋषभ पंत अपघातानंतर पूर्णपणे सावरला नाही आणि संघाचा दुसरा अनुभवी यष्टीरक्षक केएल राहुल देखील आयपीएल 2023 दरम्यान झालेल्या दुखापतीतून बरा होऊ शकलेला नाही. 


अशा स्थितीत बीसीसीआय आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांच्या हाकेला संजू सॅमसन धावून आला आहे. खरंतर संजू हा अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला संघात घेतल्याने मधल्या फळीला खूप बळ मिळेल. याच कारणामुळे बीसीसीआय आणि रोहित शर्माने त्याला संघात स्थान दिले आहे. पण त्याला संघातून बाहेरचा रस्ता कधी दाखवेल याचा भरवसा नाही.


वेस्ट इंडिज मालिकेसाठी एकदिवसीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (विकेट कीपर), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.