World Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर सौरव गांगुलीचं खळबळजनक विधान म्हणाला, `टीम इंडियाचे बॉलर्स...`
India Cricket Team : टीम इंडियाच्या फास्टरने खतरनाक गोलंदाजीचं प्रदर्शन केल्याने टीम इंडियामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगली (Sourav Ganguly) याने खळबळजनक विधान केलं आहे.
Sourav Ganguly statement : फलंदाज तुम्हाला सामने जिंकवतात, मात्र गोलंदाज तुम्हाला वर्ल्ड कप (World Cup 2023) जिंकवून देतात, असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पहायला मिळाला आहे. मोहम्मद शमी (Mohammed Shami) असो वा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)... या दोन्ही स्टाईक गोलंदाजांनी सर्व सामन्यात आपल्या गोलंदाजीचे जलवे दाखवले आहेत. तर दुसरीकडे मोहम्मद सिराज विरोधी संघाच्या फलंदाजांच्या नांग्या ठेचण्याचं काम करतोय. टीम इंडियाच्या (India Cricket Team) फास्टरने खतरनाक गोलंदाजीचं प्रदर्शन केल्याने टीम इंडियामध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगली (Sourav Ganguly) याने खळबळजनक विधान केलं आहे.
काय म्हणाला Sourav Ganguly ?
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आतापर्यंतचा सर्वोत्तम वेगवान आक्रमण आहे, असं मी म्हणू शकत नाही. 2003 च्या विश्वचषकात आशिष नेहरा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनीही चांगली गोलंदाजी केली होती. त्यांनी त्यावेळी फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
बुमराह, शमी आणि सिराजची गोलंदाजी पाहणे नक्कीच खूप रोमांचक आहे. जेव्हा तुमच्या संघात बुमराह असतो तेव्हा खूप फरक पडतो. या स्थितीत फलंदाजांवर नेहमीच दबाव असतो कारण गोलंदाजी जोडीने केली जाते. बुमराह इतर दोन सहकारी गोलंदाजांवरही मोठा प्रभाव टाकतो, असं म्हणत सौरव गांगलीने बुमराहचे गोडवे गायले आहेत. तर, मोहम्मद शमी सुरुवातीपासूनच प्लेइंग इलेव्हनचा भाग असायला हवा होता. मोहम्मद शमीने किती फरक केला आहे ते तुम्हीच बघा. पहिल्या चार सामन्यांमध्ये शमी बाहेर बसला होता, पण पुढच्या चार सामन्यांमध्ये शमीने 16 बळी घेत आघाडीचा गोलंदाज म्हणून उदयास आला, असं म्हणत दादाने शमीचं कौतूक केलंय.
दरम्यान, शमीने फक्त 5 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहने 9 सामन्यात 15 विकेट्स नावावर केल्या आहेत. त्याचबरोबर सिराजच्या नावावर देखील 10 विकेट्स आहेत. तर फिरकी गोलंदाजांनी देखील मनगटाची जादू दाखवलीये. रविंद्र जडेजाने 14 तर कुलदीप यादवने 12 विकेट्स नावावर केल्या आहेत.