New Zealand शेवटची मॅच न खेळताच वर्ल्ड कपमधून बाहेर? पाकिस्तानसाठी Good News
World Cup 2023 Threat In New Zealand vs Sri Lanka Clash: सेमी फायनलच्या शर्यतीमध्ये न्यूझीलंडबरोबरच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानही असून सध्याची स्थिती पाहता पॉइण्ट्स टेबलमध्ये वर असलेल्या न्यूझीलंडपेक्षा पाकिस्तान पात्र होण्याची शक्यता अधिक वाटत आहे. असं का ते जाणून घ्या...
World Cup 2023 Threat In New Zealand vs Sri Lanka Clash: वर्ल्ड कप 2023 मधील शेवटचे काही सामने शिल्लक आहेत. भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. बुधवारी (8 नोव्हेंबर 2023) झालेल्या इंग्लंडविरुद्ध नेदरलॅण्ड सामन्यामध्ये इंग्लंडने विजय मिळवल्याने नेदरलॅण्डही सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर पडला आहे. चौथ्या क्रमाकांवर पात्र ठरण्यासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चुरस सुरु आहे. या तिन्ही टीम पॉइण्ट्स टेबलमध्ये प्रत्येकी 8 गुणांसहीत अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत.
कोण कोणत्या स्थानी?
न्यूझीलंडचा नेट रन रेट +0.398 इतका असून पाकिस्तानचा नेट रन रेट +0.036 वर तर अफगाणिस्तानचा नेट रन रेट -0.338 इतका आहे. न्यूझीलंडचा शेवटचा सामना आज श्रीलंकेविरुद्ध होत आहे. पाकिस्तानचा साखळी फेरीतील शेवटचा सामना शनिवारी कोलकात्यामध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे. दर अफगाणिस्तानचा शेवटचा सामना शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडला केवळ श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकायचा आहे. हा सामना जिंकला तरी न्यूझीलंड सेमीफायनलसाठी पात्र ठरणारी चौथी टीम ठरेल. नेट रन रेट पाहता न्यूझीलंड पात्र होण्याची शक्यता अधिक असली तर केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघासमोर अजून एक आव्हान आहे. हे आव्हान एवढं मोठं आहे की न्यूझीलंडचा संघ मैदानात न उतरताच थेट स्पर्धेबाहेर फेकला जाऊ शकतो.
न्यूझीलंडचं टेन्शन वाढणार कारण...
न्यूझीलंडचा शेवटचा सामना आज श्रीलंकेविरुद्ध बेंगळुरुमध्ये होत आहे. आज बेंगळुरुमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण वाटून दिला जाईल. असं झालं तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे. न्यूझीलंडला एक गुण मिळाला तर ते 9 गुण मिळवून सेमीफायलनच्या स्पर्धेतून बाहेर पडतील. कारण त्यानंतर पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान सामना जिंकले तर ते 10 पॉइण्ट्ससहीत चौथ्या स्थानी झेप घेतील. यातही दोघेही जिंकले तर नेट रन रेटच्या आधारे चौथा संघ ठरवला जाईल. सध्या तरी पाकिस्तानचं नेट रन रेट अफगाणिस्तानपेक्षा सरस आहे.
काय आहे शक्यता?
अॅक्यूवेदर डॉट कॉमवरील माहितीनुसार आज दिवसभर बंगळुरुमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगळुरुमध्ये 3 तास पाऊस पडेल अशी 90 टक्के शक्यता सकाळच्या वेळासाठी व्यक्त करण्यात आली असून आकाशामध्ये ढगांची चादर असेल अशी शक्यता 86 टक्क्यांपर्यंत आहे. सांयकाळीही जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही न्यूझीलंडला बसला फटका
न्यूझीलंडच्या संघाने स्पर्धेच्या सुरुवातील दमदार कामगिरी केली. मात्र त्यानंतर सातत्याने न्यूझीलंडचा पराभवाचं तोंड पहावं लागल्याने त्यांना आता साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे डक वर्थ लुईस नियमानुसार 21 धावांनी जिंकला होता.