Sport News : भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने मुसंडी मारत सुपर विजय मिळवला असून 1-1 ने मालिका बरोबरीत आहे. दुसरीकडे एकदिवसीय मालिकांमध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहे. ज्यात त्याने आपली जबाबदारी आतापर्यंत अतिशय चोखपणे पार पाडताना दिसत आहे. अशातच माजी खेळाडू आणि भारतीय संघाचे माजी निवडकर्ते सबा करीम यांनी शिखरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.  (World Cup 2023 Will Rohit Sharma Shikhar Dhawan open for World Cup? Sport Marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदिवसीय विश्वचषकासाठी (ODI World Cup 2023) शिखर धवनचे संघात स्थान पूर्णपणे निश्चित मानलं केलं गेलं पाहिजे. त्याच्यावर कोणताही अतिरिक्त दबाव टाकू नये. मला वाटतं की निवड समितीनेही निर्णय घेतला असावा की, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये शिखर आणि रोहित शर्मा सलामीला दिसतील, असं सबी करीम यांनी म्हटलं आहे. 


शार्दुल ठाकूरला (Shardul Thackur) वनडे विश्वचषकासाठी संघात स्थान मिळू शकत नाही. कारण त्याच्या आधी हार्दिक पांड्याला प्राधान्य दिलं जाईल. मधल्या फळीत फलंदाज म्हणून फार महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. शार्दुल आणि पांड्यामध्ये पांड्या वरचढ असल्याचंही सबा करीम म्हणाले.


दरम्यान, आती तरी भारतीय संघाचं ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघानुसार वर्ल्डकपमध्ये भारताकडून सलामीला रोहित शर्मा आणि के. एल. राहुल उतरणार आहेत. आशिया कपमधील पराभवानंतर रोहित एँड कंपनीचं मिशन वर्ल्डकप आहे. सर्व भारतीयांच्या नजरा भारतीय संघाच्या कामगिरीकडे असणार आहेत.