Pakistan Team World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर आता या टीमबद्दल एक वाईट बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सामना खेळण्यापूर्वीच संघ अडचणीत सापडला आहे. पाकिस्तान टीमवर व्हायरलचं संकट ओढवलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे स्टार खेळाडू आजारी पडले आहेत.(World Cup A big blow to Pakistan before the match against Australia these three key players will be out pakistani players down with viral infection)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्डकपमधील आतापर्यंतचा पाकिस्तानचा प्रवास पाहिला तर त्यांनी 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी 2 मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आहे. वर्ल्ड कपमधील तिसरा सामना भारताविरोधात झाला होता. ज्यात भारतीय संघाने त्यांचा दारुण पराभव  केला आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे एक नाही दोन नाही तब्बल चार खेळाडू आजारी पडल्याचं वृत्त समोर आलं आहे. 


पाकिस्तानचा चौथा सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 ऑक्टोबरला असणार आहे. त्यासाठी बाबर आझमची टीम बंगळुरुमध्ये पोहोचली आहे. भारतासाठी पराभवनंतर पाकिस्तानचा संघ -0.137 नेट रन रेटसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. त्यामुळे वर्ल्डकपमधील आपलं आव्हान टिकविण्यासाठी ऑस्ट्रेलियासोबतच जिंकण त्यांच्यासाठी गरजेचं आहे. पण आधीच पाकिस्तान संघावर दुहेरी टेन्शन आलं आहे. 


स्टार खेळाडू आणि सलामीवीर अब्दुल्ला शफीक, शाहीन शाह आफ्रिदी आणि उसामा मीर यांना व्हायरल इफेक्शन झालं आहे. त्यांना ताप आला आहे.  गेल्या 4-5 दिवसांपासून उसामा मीर हा गंभीर आजारी होता, त्याची प्रकृती सुधारतेय. त्यांना अँटिबायोटिक ड्रॉप्स देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. झमन खानही आजारी पडला होता पण आता तो बरा आहे.  त्यामुळे पाकिस्तान संघावर सराव सत्र रद्द करण्याची वेळ आली आहे.



वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघ:


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, शाहीन आफ्रिदी, उसामा मीर, सौद शकील, हरिस रौफ , मोहम्मद वसीम जूनियर 


राखीव खेळाडू : मोहम्मद हरिस, अबरार अहमद, जमान खान