How Can Pakistan Qualify for Semis Toss Will Decide: वर्ल्ड कप 2023 मधील 42 व्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर 5 विकेट्स आणि 15 बॉल राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे अफगाणिस्तानचं सेमीफायलनचं स्वप्न भंगलं आहे. मात्र दुसरीकडे आज पाकिस्तानसाठी करो या मरोचा सामना असणार आहे. पाकिस्तानी संघ सेमीफायलनमध्ये पात्र ठरण्याची शक्यता अगदी 0.01 टक्के असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही. पाकिस्तानला नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी इंग्लंडला फार मोठ्या फरकाने पराभूत करावं लागणार आहे. मात्र इंग्लंड आणि पाकिस्तान सामन्याच्या टॉसमधूनच पाकिस्तान सेमीफायलनलला जाणार की कराचीला जाणार हे स्पष्ट होणार आहे. 


सध्या स्थिती काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही संघ अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असून सेमीफायलनसाठी ते पात्र ठरले आहेत. चौथ्या स्थानावर सध्या न्यूझीलंडचा संघ असून त्यांचं स्थान अबाधित राहिल असं दिसत आहे. मात्र पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अविश्वसनिय कामगिरी केली तर ते चौथ्या स्थानावर झेप घेऊ शकतात. सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये चुरस कायम आहे. न्यूझीलंडने साखळीफेरीतील शेवटचा सामना जिंकून चौथं स्थान कायम राखलं आहे.


न्यूझीलंडने 9 पैकी 5 सामने जिंकले असून 10 पॉइण्ट्सहीत ते +0.743 नेट रन रेटसहीत चौथ्या स्थानी आहेत. 10 पॉइण्ट्सपर्यंत मजल मारण्याची संधी पाकिस्तानलाही आहे. मात्र त्यांना नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी भीमपराक्रमच करावा लागणार आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट +0.036 आहे. पाकिस्तानला आता केवळ शेवटचा सामना जिंकून चालणार नाही. त्यांना आपला +0.036 हा नेट रन रेट न्यूझीलंडच्या नेट रन रेटपेक्षा म्हणजेच +0.743 हून अधिक सरस करण्यासाठी पहिल्यांदा फलंदाजी केल्यास 287 धावांच्या फरकाने इंग्लंडला पराभूत करावं लागेल. 


नक्की वाचा >> भारताने जे दोनदा केलं ते पाकिस्तानला एकदा जरी जमलं तरी Semifinal चं तिकीट Fix



पहिल्यांदा फलंदाजी केल्यास गणित कसं?


पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी केली आणि त्यांनी 300 धावा केल्या तर त्यांना इंग्लंडला 13 धावांवर बाद करावं लागले. किंवा 350 धावा केल्या तर इंग्लंडचा संघ 63 धावांच्या आत तंबूत असेल अशी कामगिरी पाकिस्तानला करावी लागेल. पाकिस्तानला 400 धावा करता आल्या तर इंग्लंड 112 किंवा त्या आत ऑल आऊट झाल्यास पाकिस्तान सेमीफायलनसाठी पात्र ठरेल. हाच हिशोब 450 धावा केल्यास इंग्लंडला 162 च्या आत बाद करणे किंवा 500 धावा केल्या तर इंग्लंडला 211 धावांवर बाद करणे असे आहे.


नक्की वाचा >> 'इंग्लंडच्या संघाला कोंडून घ्या आणि...'; Semi Finals साठी पाकिस्तानला अक्रमचा चक्रम सल्ला


पहिल्यांदा गोलंदाजी केली तर?


पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केल्यास त्यांना जिंकण्याची अपेक्षा तरी असेल पण पाकिस्तानने आधी क्षेत्ररक्षण केल्यास त्यांना नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला पराभूत करणं अशक्यच आहे. कारण पाकिस्तानने आधी क्षेत्ररक्षण केलं आणि इंग्लंडने 20 धावांचं टार्गेट दिलं असेल तर ते 1.3 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागेल. 50 धावांचं टार्गेट असेल तर 2 ओव्हरमध्ये, 100 धावांचं टार्गेट असेल तर 2.5 ओव्हरमध्ये आणि 150 धावांचं टार्गेट 3.4 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागेल. तसेच 200 धावांचं टार्गेट असल्यास ते 4.3 ओव्हरमध्ये गाठावं लागेल. तसेच 300 धावांचं टार्गेट 6.1 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागेल. वरील 6 शक्यतांपैकी एकही शक्यता वास्तवात शक्य नाही.


नक्की वाचा >> World Cup चा अंतिम सामना होणारचं नाही? भारताची कामगिरी पाहून...


...म्हणून टॉसच ठरवणार पाकिस्तान इन की आऊट


पहिल्यांदा फलंदाजी आणि पहिल्यांदा गोलंदाजी अशा दोन्ही शक्यता पाहिल्यास सामन्याचा टॉसच पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये राहणार की बाहेर जाणार हे समजणार आहे. म्हणजे इंग्लंडने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी घेतली तर पाकिस्तान बाहेर पडल्यात जमा आहे. कारण इंग्लंडला 13 धावांवर रोखणं अशक्य आहे. तसेच दुसरी शक्यता पाहिल्यास 2 ओव्हरमध्ये 50 धावा करणंही शक्यच नाही.



...तर न्यूझीलंड ठरणार पात्र


पाकिस्तानला वरीलपैकी काहीच शक्य झालं नाही आणि त्यांनी केवळ सामना जिंकला तरी न्यूझीलंडच चौथ्या स्थानी राहील आणि सेमीफायलनसाठी पात्र ठरेल. न्यूझीलंड पात्र ठरल्यास त्यांना सेमीफायनलचा सामना भारताविरुद्ध खेळावा लागणार आहे.