मुंबई: दुबईमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दणदणीत विजय मिळवला आहे. मिचेल मार्शने नाबाद 77 धावा केल्या. तर डेव्हिड वॉर्नरने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. या तर मॅक्सवेलनेही 28 धावांची जोड दिली. त्यामुळे न्यूझीलंडने उभारलेल्या धावांचा डोंगर कांगारू टीमला पार करणं शक्य झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ मालामाल झाला आहे. याशिवाय कोणत्या संघाला किती रुपये मिळाले याची उत्सुकता सर्वांनाच आहे. टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाला किती पैसे मिळाले याची उत्सुकता देखील आहे. आज याबाद्दल जाणून घेऊया. 


ICC च्या नियमानुसार, सुपर-12 मध्ये 3 सामने जिंकण्यासाठी 1, 20,000 डॉलरची बोनस रक्कम मिळणार नाही. टीम इंडिया सुपर 12 टप्प्यात खेळली. मात्र सेमीफायनल मधून बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या वाट्याला 70 हजार डॉलर आले आहेत. टीम इंडियाला एकूण रक्कम 1.41 कोटी रुपये मिळणार आहे. 


भारतासोबत अफगाणिस्तान, नामीबिया, स्कॉटलँड, आणि ग्रूप 1 मध्ये दक्षिण अफ्रीका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि बांग्लादेशला 40 हजार अमेरिकी डॉलर्स मिळणार आहेत. याशिवाय सुपर 12 मध्ये जिंकलेल्या संघाला 70 हजार अमेरिकी डॉलर्स मिळाले आहेत. 


टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाला 1.6 मिलियन डॉलर रक्कम मिळाली आहे. उपविजेत्या संघाला 800,000 डॉलर्स रक्कम मिळाली आहे. तर सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या दोन संघांना इंग्लंड आणि पाकिस्तानला 400,000 डॉलर्स रक्कम देण्यात आली आहे.