World Test Championship Final साठी टीम इंडियाची घोषणा
टीम इंडियामधून कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला डिच्चू, जडेजाची संघात एन्ट्री
मुंबई: देशातील वाढत्या कोरोनामुळे IPLचे सामने तुर्तास स्थगित झाले आहेत. जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंची नुकतीच निवड करण्यात आली आहे. 18 ते 22 जून दरम्यान इंग्लंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये कोणाला संधी मिळाली आणि कोणाला डिच्चू मिळाला याची उत्सुकता सर्वांनाच होती.
हार्दिंक पांड्याला डिच्चू तर शॉचा विचार नाहीच
पृथ्वी शॉची IPLमधील कामगिरी जबरदस्त होती. त्यामुळे त्याचा विचार केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. टीम इंडियाचा स्क्वाड जाहीर झाला असून त्यामध्ये पृथ्वी के एल भरतचा विचार करण्यात आलेला नाही.
ऑलराऊंडर खेळाडू हार्दीक पांड्याला संघातून डच्चू मिळाला आहे. संघामध्ये हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आलेलं नाही. तर IPLमध्ये धुमाकूळ माजवणाऱ्या आणि गेम चेंजर ठरलेल्या रवींद्र जडेजा संघात परतला आहे.
18 ते 22 जून दरम्यान साउथेम्प्टन इथे न्यूझीलंड विरुद्ध भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळली जाणार आहे.
टीम इंडियाच्या निवडीदरम्यान ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान अर्झन नगवासवाला या खेळाडूंना स्टॅडबायसाठी ठेवलं आहे. अॅपेंडिक्सचं ऑपरेशन करण्यात आलेल्या के एल राहुल आणि कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ऋद्धिमान साहाला देखील संघात संधी देण्यात आली आहे. ते पूर्णपणे बरे झाल्यानंतर टीम इंडियामध्ये सहभागी होणार आहेत.
टीम इंडियामध्ये कोणकोण?
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधारन), अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, के एल राहुल, ऋद्धिमान साहा (फिटनेस क्लिअरन्सच्या आधीन)