मुंबई: आपल्या फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या विराट कोहलीची आता लूकवरून चर्चा होत आहे. हॅण्डसम विराट कोहलीचा हा वेगळाच स्टायलिश लूक सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे. कॅप्टन कूल धोनीनंतर आता विराटच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या या नव्या लूकची तुलना फिल्म स्टार बॉबी देओल आणि प्रोफेसरसोबत केली जात आहे. नेमका काय आहे हा विराटचा नवा लूक आणि का होते चर्चा जाणून घेऊया.


विराट कोहलीनं पिवळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. नेहमी स्टाइलमध्ये असणारे केस वाढवले आहेत. आणि सोबत डोळ्यावर चष्मा देखील आहे. त्याचा हा हटके लूक काही चाहत्यांना आवडला तर काहींनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. 







काही युझर्सनी विराटच्या या लूकची तुलना मनी हाइस्टमधील प्रोफेसरशी केली तर काही युझर्सनी बॉबी देओलशी केली आहे. विराटचा हा लूक चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. 


कॅप्टन कूल MS Dhoniचा नवा लूक पाहून चाहते शॉक! ट्वीटरवर केल्या मजेशीर कमेंट्स


टीम इंडिया 18 जून ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया हा सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध कसोटी सीरिज देखील खेळवली जाणार आहे. विराट सेना सध्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. 2 जूनच्या आसपास इंग्लंडला जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.