पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सगळ्यात मोठा विजय आहे. या विजयासोबतच भारताने ३ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-०ने विजयी आघाडी घेतली आहे. तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये २०० पॉईंट्स मिळवणारी भारतीय टीम पहिलीच ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ९ देशांचा समावेश आहे. यामध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज यांच्या मॅचना सुरुवात झाली आहे. तर पाकिस्तान आणि बांगलादेशने अजून एकही मॅच खेळलेली नाही.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने सर्वाधिक मॅच खेळल्या आहेत. या दोन्ही टीमनी प्रत्येकी ५ तर भारताने ४ मॅच खेळल्या आहेत. न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजच्या प्रत्येकी २-२ मॅच तर दक्षिण आफ्रिकेच्याही २ मॅच झाल्या आहेत.


ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक मॅच खेळल्या असल्या तरी पॉईंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे प्रत्येकी ६०-६० पॉईंट्स आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने प्रत्येकी ५६-५६ पॉईंट्स कमावले आहेत.


भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये १२० पॉईंट्स मिळाले होते. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली आणि दुसरी टेस्ट जिंकल्यामुळे प्रत्येकी ४०-४० असे ८० पॉईंट्स मिळाले आहेत.