Ranbir Kapoor On Virat Kohli's biopic : मुंबईत खेळल्या गेलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड कप 2023 सेमीफायनलमध्ये सेलिब्रिटींची मोठी गर्दी वानखेडे मैदानात पहायला मिळाली. सुपरस्टार रजनीकांत ते ब्रिटीश स्टार फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम मैदानात उपस्थित होते. त्याचबरोबर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मैदानात उपस्थित राहून टीम इंडियाला सपोर्ट केला. त्यांच्यामध्ये रणबीर कपूरचाही (Ranbir Kapoor) समावेश होता. रणबीरने यावेळी त्याच्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या अॅनिमल (Animal) सिनेमाचा टीशर्ट घातला होता. सामना झाल्यावर रणबीर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि रवी शास्त्री यांच्याशी गप्पा मारतानाही दिसला होता. त्यावेळी त्याला एक प्रश्न विचारण्यात आला.


काय म्हणाला Ranbir Kapoor ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅचदरम्यान झालेल्या संभाषणात रणबीर कपूरला विचारण्यात आलं की, त्याला बायोपिकमध्ये विराटची भूमिका साकारण्यात रस आहे का? या प्रश्नावर रणबीरने मजेशीर उत्तर दिलं. विराट कोहलीवर बायोपिक (Virat Kohli's biopic) बनवल्यास विराटने स्वत: त्याची भूमिका साकारली पाहिजे कारण तो अनेक अभिनेत्यांपेक्षा चांगला दिसतो आणि फिटनेसच्या बाबतीतही उत्तम आहे, असं रणबीरने म्हटलं आहे. (Ranbir Kapoor On Virat Kohli's biopic)


विराटला माझा आवडता क्रिकेटर आहे. मी एमएस धोनीला 2011 मध्ये वानखेडेवर विश्वचषक ट्रॉफी (World Cup Trophy) उचलताना पाहिलं होतं. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आहे. आता अंतिम फेरीत विजय मिळवून भारत पुन्हा चॅम्पियन होईल, अशी आशा देखील रणबीरने व्यक्त केली आहे.


आणखी वाचा - AUS vs SA : साऊथ अफ्रिकेचं स्वप्नभंग! पुन्हा ठरली चोकर्स, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी; पाहा Video


दरम्यान, सेमीफायनल सामन्यात विराट कोहलीने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीतील 50 वं शतक झळकावून इतिहासात स्थान मिळवलं. यावेळी त्याची पत्नी अनुष्का शर्माने त्याला जल्लोष केला तर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने देखील टाळ्या वाजवत विराटचं अभिनंदन केलं होतं.