WPL 2023 DC vs GG : आज महिला प्रिमीयर लीगच्या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध गुजरात जाएंट्स (Gujrat Giants) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात जाएंट्सचा 11 रन्सने विजय झाला आहे. मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला होता. दिल्लीचा या स्पर्धेतील हा दुसरा पराभव होता.


गुजरातचं दिल्लीला 148 रन्सचं लक्ष्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय दिल्लीसाठी अधिक फायदेशीर ठरला नाही. यावेळी गुजरातच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. गुजरातकडून एल वोल्वार्ड्ट (57) आणि एश्ले गार्डनर (51) या दोघींनी अर्धशतक झळकावलं. 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून गुजरातने 147 रन्सपर्यंत मजल मारली.


दिल्लीची फलंदाजी ढेपाळली


दिल्लीच्या टीमला 148 रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. गेल्या सामन्यात तुफान फलंदाजी केलेल्या शेफाली वर्माला आजच्या सामन्यात साजेसा खेळ करता आला नाही. दिल्लीकडून मारिजाने कॅप हिने सर्वाधिक म्हणजेच 36 रन्स केले. तर त्या खालोखाल अरूंधती रेड्डीने 25 रन्सची खेळी केली. गुजरातकडून किम गार्थ, तनुजा, एश्ले गार्डनर यांना प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळाल्या आहेत.


दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग 11


मेग लॅनिंग (कर्णधार), शेफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमिमा रॉड्रिग्स, मारिजाने कॅप, जेस जोनासेन, तान्या भाटिया (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव


गुजरात जाएंट्सची प्लेईंग 11


सोफिया डंकले, एल वोल्वार्ड्ट, हरलीन देओल, एश्ले गार्डनर, दयालन हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), सुषमा वर्मा (विकेटकीपर), किम गर्थ, तनुजा कंवर, मानसी जोशी, अश्विनी कुमारी