WPL 2023 Highlights, RCB vs DC: महिला प्रिमियर लीगच्या (Women Premiere League) दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) विजयी सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) 60 धावांनी पराभव केला. कर्णधार मेग लॅनिग (Megg Lanning) आणि शेफाली वर्मा (Shefali Varma) यांनी अर्धशतकं ठोकत संघासाठी मोठी धावसंख्या उभारली. पहिल्या विकेटसाठी दोघींनाही 162 धावांची भागीदारी केली. दिल्ली कॅपिटल्सने 20 ओव्हर्समध्ये फक्त 2 गडी गमावत 223 धावा केल्या. रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने 60 धावांनी हा सामना गमावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या चेंडूपासून मेग लॅनिग आणि शेफाली वर्मा यांनी आक्रमक सुरुवात केली होती. दोघीही पहिल्याच सामन्यात शतक ठोकतील अशी शक्यता दिसत होती पण बंगळुरुच्या हेथरने 15 व्या ओव्हरमध्ये मेग लॅनिगला बाद करत संघाला पहिलं यश मिळवून दिलं. तिने 43 चेंडूत 77 धावा केल्या. 167.44 च्या स्ट्राइक रेटने केलेल्या खेळीत तिने 14 चौकार ठोकले. याच ओव्हरमध्ये शेफाली वर्मादेखील बाद झाली. शेफालीने 186.66 च्या स्ट्राइक रेटने 45 चेंडूत 84 धावांची स्फोटक खेळी केली. शेफालीने 10 चौकार आणि चार षटकार लगावले. मात्र यानंतर दिल्ली कॅपिटल्सने एकही विकेट गमावला नाही. दिल्लीने बंगळुरुसमोर 224 धावांचं आव्हान दिलं होतं. 



रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडडून कर्णधार स्मृती मंधानाने चांगली सुरुवात केली होती. सोफीसबोत मिळून तिने पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. पाचव्या ओव्हरमध्ये सोफीने आपली विकेट गमावली. मंधाना चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होती. पण ती मोठी खेळी करु शकली नाही. 23 चेंडूत 35 धावा करत ती तंबूत परतली. 20 ओव्हर्समध्ये बंगळुरु फक्त 168 धावाच करु शकला. त्यांनी एकूण 8 गडी गमावले. 60 धावांनी बंगळुरुने हा सामना गमावला.