WPL च्या पहिल्याच सामन्याच वादाची ठिणगी; परदेशी खेळाडूकडून राष्ट्रगीताचा अपमान
वुमेंस प्रिमीयर लीगची प्रत्येकाला उत्सुकता होतीच. मात्र याचदरम्यान परदेशी महिला खेळाडूकडून मोठी चूक झाली. पहिल्याच सामन्याच्या सुरुवातील परदेशी खेळाडूकडून राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचं समोर आलंय.
WPL 2023 : अखेर आज तो दिवस आालाच, ज्याची क्रिकेटप्रेमी अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. आज म्हणजेच 4 मार्चपासून महिला आयपीएलला (WPL 2023) सुरुवात झाली आहे. बीसीसीआयने (BCCI) देशातील महिला क्रिकेटपटूंना दिलेली ही भेट एका नव्या इतिहासाकडे वाटचाल करणार आहे. वुमेंस प्रिमीयर लीगमध्ये डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि गुजरात जायंट्स (Gujarat Giants) यांच्यामध्ये पहिला सामना रंगला. दरम्यान पहिल्याच सामन्यात वादाला तोंड फुटलेलं दिसलं.
वुमेंस प्रिमीयर लीगची प्रत्येकाला उत्सुकता होतीच. मात्र याचदरम्यान परदेशी महिला खेळाडूकडून मोठी चूक झाली. पहिल्याच सामन्याच्या सुरुवातील परदेशी खेळाडूकडून राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचं समोर आलंय.
गुजरात जाएंटसची टीमची कर्णधार बेथ मुनी आणि मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्यामध्ये टॉस झाला. मुनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सर्व कामगिरीनंतर धमाकेदार उद्घाटन सोहळ्यानंतर भारताच्या राष्ट्रगीताची पाळी आली होती. राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी ज्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरल्या होत्या.
परदेशी खेळाडूकडून राष्ट्रगीताचा अपमान
जेव्हा सर्व खेळाडू भारताच्या राष्ट्रगीतासाठी उभे असताना गुजरात जायंट्सची एक खेळाडू मात्र स्तब्ध उभी नव्हती. यावेळी ती हात चोळत असताना कॅमेरामध्ये कैद झाली. मुख्य म्हणजे हा राष्ट्रगीताचा अपमान मानला जातो. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. दरम्यान भारतीय चाहत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
गुजरात जाएंट्सच्या महिलांना 208 रन्सचं आव्हान
वुमेंस प्रिमीयर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सच्या टीमचा बोलबाला दिसून आला. मुंबईच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांना धुतलं. 20 ओव्हर्समध्ये मुंबईने 207 रन्स केले. यावेळी मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने उत्तम फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. याशिवाय अमेलिया केर हिने नाबाद 45 रन्सची खेळी केली. तर ओपनर हीली मैथ्यूजचं अर्धशतक केवळ 3 रन्सने हुकलं. अखेर 5 विकेट्स गमावत गुजरातच्या महिलांना 208 रन्सचं टार्गेट देण्यात आलं.
गुजरात जाएंट्स टीमचं प्लेईंग 11
बेथ मूनी (कर्णधार), सब्बिनेनी मेघना, हरलीन देओल, एश्ले गार्डनर, एनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेयरहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी
मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11
हरमनप्रीत कौर (कर्णधार), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नताली सीवर-ब्रंट, हीली मैथ्यूज, पूजा वस्त्रकार, इस्सी वोंग, हुमायरा काजी, अमेलिया केर, अमनजोत कौर, जिंतिमनी कलिता, सायका इशाक