WPL 2023, MI vs RCB: आज हरमनप्रीत-मानधना आमनेसामने, कोण मारणार बाजी?
WPL 2023, MI vs RCB: मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स (MI vs RCB) आमनेसामने येणार असून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे.
WPL 2023, MI vs RCB: महिला प्रीमियर लीग या स्पर्धेतील आज चौथा सामना खेळला जाईल. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स (MI vs RCB) आमनेसामने येणार असून कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महिला प्रीमियर लीगचा चौथा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगणार आहे. तसेच महिला प्रीमियर लीग 2023 मध्ये RCB ला त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 223 धावा केल्या होत्या. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ निर्धारित 20 षटकांत 163 धावाच करू शकला. या सामन्यात आरसीबीला 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
हा सामना टीम इंडियाची (Team India) कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यात आहे. गुजरात जायंट्सविरुद्धच्या हरमनप्रीतने वादळी फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले होते. हरमनप्रीतने 23 चेंडूत 35 धावांची धडाकेबाज खेळी केली. तिच्याशिवाय अमोलिया केरनेही स्फोटक फलंदाजी केली होती. मुंबईने गुजरात जायंट्सवर 143 धावांनी दणदणीत विजय मिळवत आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्याचवेळी बेंगळुरूला दिल्ली कॅपिटल्सकडून 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अशा स्थितीत एकीकडे मुंबई विजयाची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. तर दुसरीकडे बेंगळुरू पहिल्या विजयासाठी मैदानात उतरेल.
वाचा: शेफाली वर्माची तुफान फलंदाजी, जबरदस्त Six पाहून चाहत्यांना आठवला विराट कोहली
खेळपट्टीचा अहवाल
WPL 2023 मधील दोन्ही ठिकाणे उच्च स्कोअरिंग खेळपट्ट्या आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पहिल्या डावात फलंदाजांनी चांगली कामगिरी केली असून आगामी खेळही यापेक्षा वेगळा असणार नाही. पहिल्या डावात फलंदाजांना मिळालेला फायदा पाहता नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करून लवकर फायदा घेऊ शकतो. तसेच सध्या मुंबईतील हवामान क्रिकेटपटूसाठी अगदी योग्य आहे. तापमान 30 अंशांच्या आसपास असेल आणि पावसाची कोणतीही शक्यता नसल्यामुळे मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम खेळण्यासाठी सज्ज असेल.
मुंबई इंडियन्स : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतिमनी कलिता, सायका इशक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, हीदर नाइट, दिशा कसाट, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, आशा शोभना, प्रीती बोस, मेगन शुट, रेणुका ठाकूर