RCB vs MI : महिलांच्या प्रिमीअर लिग  2024 मध्ये मुंबईविरूद्ध बंगळूरूच्या सामन्यात RCB ने बाजी मारून प्लेऑफमध्ये एकदम धमाकेदार एंट्री घेतली आहे.. या सामन्याची हिरो ठरलेली एलिस पेरी हिने मॅचमध्ये सर्वात महत्वाचे योगदान देत मुंबईच्या फलंदाजांना धूळ चारली आणि आर्ध्यापेक्षा जास्त टीम तंबूत परत पाठवली.  WPL च्या इतिहासात एलिस पेरीने एका मॅचमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


पेरीच्या भेदक माऱ्यासमोर मुंबईची बॅटिंग फेल
 


एलिस पेरीच्या गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी गूडघे टेकले. पेरीने एक-दोन नाही तर चक्क 6 विकेट्स घेत मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची हवाच काढली आहे. एलिस पेरीने 4 ओव्हर्सच्या स्पेलमध्ये फक्त 15 धावा देत 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय. डब्लूपीएलच्या इतिहासातली ही एका गोलंदाजाकडून केलेली सर्वात उत्तम कामगिरी आहे. याआधी हा रेकॉर्ड साऊथ आफ्रिकेची गोलंदाज मारिजाने कप्पच्या नावावर होता. मारिजाने त्या मॅचमध्ये 15 रन्स देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. एलिस पेरीने आपल्या बॉलिंगचे घातक प्रदर्शन करत मुंबईची कॅप्टन हरमनप्रीत कौरला शून्यावर आऊट केले आणि यासोबतच अमीलिया केर, अमनजोत कौर आणि पूजा वस्त्रकार यांना 10 धावा करण्याआधीच गारद केले होते.
 


19 व्या ओव्हरमध्येच मुंबईची बॅटिंग डामाडोल
 


मुंबई इंडियन्सने सर्वात आधी प्लेऑफमध्ये जागा बनवली आहे. पण एलिस पेरीसमोर मुंबईची धाकड बॅटिंगसूद्धा फिकी पडली होती. मुंबईची पूर्ण टीम 19 व्या ओव्हरीमध्येच 113 च्या धावसंखेवर ऑल आऊट झाली होती. या मॅचनंतर आरसीबी प्लेऑफसाठी पात्र ठरलेली आहे. आता बघण्यायोग्य गोष्ट असेल की, या वर्षी स्मृती मानधनाची आरसीबी डब्लूपीएलची ट्रॉफी जिंकणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.