हार्दिक पांड्यानंतर गुजरातने घेतला मोठा निर्णय, अचानक `या` दिग्गजाला केलं सामील!
Michael Klinger replaces Haynes : गुजरात जायंट्सने मोठी घोषणा केली आहे. गुजरातच्या संघात कोणता मोठा बदल (Gujarat Giants head coach) झालाय? जाणून घ्या
Gujarat Giants WPL 2024 : एकीकडे आयपीएलमध्ये गुजरातच्या संघाला मोठा धक्का बसलाय. थेट कॅप्टनने संघाला रामराम ठोकल्याने गुजरातच्या भवितव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत. अशातच आता दुसरीकडे डब्ल्यूपीएलमध्ये गुजरातने मोठा निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. महिला प्रीमियर लीग (WPL 2024) चा दुसरा हंगाम 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अशातच गुजरात जायंट्सने मोठी घोषणा केली आहे. गुजरातच्या संघात कोणता मोठा बदल (Gujarat Giants head coach) झालाय? जाणून घ्या
गुजरात जायंट्सने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी रॅचेल हेन्सच्या जागी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल क्लिंगरला (Michael Klinger) त्यांच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. मागील हंगामात गुजरातचा संघ सपशेल फेल ठरल्याचं दिसून आलं होतं. अशातच मुंबई इंडियन्ससोबत 25 फेब्रुवारी रोजी गुजरातचा पहिला सामना होणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता वाढली आहे.
गुजरात जायंट्स -
स्नेह राणा (कर्णधार), लॉरा वोल्वार्ड, फोबी लिचफील्ड, प्रिया मिश्रा, त्रिशा पूजिथा, वेदा कृष्णमूर्ती, अॅश्लेघ गार्डनर, दयालन हेमलता, हरलीन देओल, कॅथरीन ब्राइस, तनुजा कान्वेर, बेथ मूनी, काशवी गौतम, लॉरेन चीटल, मन्नत कश्यप, मेघना सिंग, शबनम शकील.
वुमन्स प्रीमियर लीगचं पूर्ण वेळापत्रक
23 फेब्रुवारी- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरू)
24 फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स (बंगळुरू)
25 फेब्रुवारी- गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (बंगळुरू)
26 फेब्रुवारी- यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरू)
27 फेब्रुवारी- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात जायंट्स (बंगळुरू)
28 फेब्रुवारी – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (बंगळुरू)
29 फेब्रुवारी – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरू)
1 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स (बंगळुरू)
2 मार्च – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स (बंगळुरू)
3 मार्च -बगुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (बंगळुरू)
4 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (बंगळुरू)
5 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दिल्ली)
6 मार्च – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (दिल्ली)
7 मार्च – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (दिल्ली)
8 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (दिल्ली)
9 मार्च – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (दिल्ली)
10 मार्च – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (दिल्ली)
11 मार्च दिल्लीमध्ये – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (दिल्ली)
12 मार्च दिल्लीमध्ये – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (दिल्ली)
13 मार्च- दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स (दिल्ली)
15 मार्च – एलिमिनेटर फेरी (दिल्ली)
17 मार्च – अंतिम फेरी (दिल्ली)