WPL 2024: 9 डिसेंबर रोजी वुमेंस प्रिमीयर लीगचा लीलाव होणार आहे. हा लिलाव मुंबईत आयोजित केला असून बीसीसीआयने (BCCI) या लिलावात समाविष्ट असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. महिलांच्या प्रिमीयर लीगमध्ये लिलावात एकूण 165 खेळाडूंची नावे नोंदवण्यात आली आहेत. या यादीत 104 भारतीय महिला खेळाडू आणि 61 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे


5 फ्रेंचायझी लावणार बोली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या पाच फ्रँचायझींनी लिलावापूर्वी 21 परदेशींसह 60 महिला खेळाडूंना कायम ठेवलं होत. पाचही फ्रँचायझींनी त्यांच्या सध्याच्या टीममधील एकूण 29 खेळाडूंना रिलीज केलं. यामध्ये कोणते खेळाडू रिटेन झालेत आणि कोणत्या फ्रेंचायझीकडे किती पैसे उरलेत हे पाहूया.


दिल्ली कॅपिटल्स


रिटेन झालेल्या खेळाडू


एलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमा रोड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिजेन कॅप, मेग लेनिंग, मिन्नू मणी, पूनम यादव, राधा यादव, शेफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तान्या भाटिया, तितास साधु.


रिलीज केलेल्या खेळाडू 


अपर्णा मंडल, जसिया अख्तर, तारा नॉरिस.


पर्स : 2.25 कोटी


स्लॉट : 3


गुजरात जायंट्स


रिटेन झालेल्या खेळाडू 


एशले गार्डनर, बेथ मूनी, दयालन हेमलता, हरलीन देयोल, लॉरा वोल्वार्ड्ट, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर.


रिलीज केलेल्या खेळाडू 


एनाबेल सदरलैंड, अश्वनी कुमारी, जॉर्जिया वेयरहॅम, हर्ले गाला, किम गर्थ, मानसी जोशी, मोनिका पटेल, पारुनिका सिसौदिया, सब्बीनेनी मेघना, सोफिया डंकले, सुषमा वर्मा.


पर्स : 5.95 कोटी


स्लॉट : 10


मुंबई इंडियंस


रिटेन झालेल्या खेळाडू


अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेले मॅथ्यूज, हुमैरा काजी, इसाबेल वोंग, जिन्तिमनी कलिता, नताली साइवर, पूजा वस्त्राकर, प्रियंका बाला, सैका इशाक, यास्तिका भाटिया.


रिलीज केलेल्या खेळाडू


धारा गुज्जर, हीदर ग्राहम, नीलम बिष्ट, सोनम.


पर्स : 2.1 कोटी


स्लॉट : 5


रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू


रिटेन झालेल्या खेळाडू


आशा शोभना, दिशा कसाट, एलिसे पेरी, हीथर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहूजा, रेणुका सिंह, ऋचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृति मंधाना, सोफी डिवाइन.


रिलीज केलेले खेळाडू


डेन वान निकर्क, एरिन बर्न्स, कोमल जांजाद, मेगन शुट्ट, पूनम खेमनार, प्रीति बोस, सहाना पवार.


पर्स : 3.35 कोटी


स्लॉट : 7


यूपी वॉरियर्स


रिटेन झालेल्या खेळाडू 


एलिसा हीली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पारशवी चोपड़ा, राजेश्वरी गायकवाड, एस यशश्री, श्वेता सहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा.


रिलीज केलेल्या खेळाडू


देविका वैद्य, शबनीम इस्माइल, शिवली शिंदे, सिमरन शेख.


पर्स : 4 कोटी


स्लॉट : 5