कोण आहे कमलिनी? 16 वर्षांच्या पोरीला मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 10 पट जास्त रक्कम देऊन खरेदी केलं
WPL 2025 Auction : मुंबई इंडियन्सने तामिळनाडूची 16 वर्षीय ऑल राउंडर जी कमलिनी हिच्यावर तब्बल 1.60 कोटी खर्च करून आपल्या संघात घेतले. तेव्हा जी कमलिनी नेमकी कोण आहे याविषयी जाणून घेऊयात.
WPL 2025 Auction : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) धर्तीवर बीसीसीआय 2023 पासून वुमन्स प्रीमियर लीगचे (Womens Premier League) देखील आयोजन करते. रविवार 15 डिसेंबर रोजी WPL 2025 साठी बंगळुरू येथे ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तामिळनाडूची 16 वर्षीय ऑल राउंडर जी कमलिनी (g kamalini) हिच्यावर तब्बल 1.60 कोटी खर्च करून आपल्या संघात घेतले. तेव्हा जी कमलिनी नेमकी कोण आहे याविषयी जाणून घेऊयात.
कोण आहे जी कमलिनी?
जी कमलिनी ही 16 वर्षांची असून ती उत्कृष्ट ऑल राउंडर आहे. जी कमलिनी ही मूळ तामिळनाडूची असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या उत्तम परफॉर्मन्समुळे ती चर्चेत आली होती. जी कमलिनी जेव्हा ऑक्शनमध्ये आली तेव्हा सर्व संघांची नजर तिच्यावर होती. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सम या दोन संघांमध्ये तिला खरेदी करण्यासाठी चुरस लागली होती. मात्र अखेर त्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली.
जी कमलिनीचं क्रिकेट करिअर :
16 वर्षीय कमलिनीने हालअंडर-19 महिला टी-20 ट्रॉफीमध्ये आठ सामन्यांत 311 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. आपल्या शानदार खेळामुळे तिने तामिळनाडूला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. षटकार मारण्याची तिची क्षमता तिला सर्वात खास बनवते. डावखुरी फलंदाज असलेल्या जी कमलिनीने या स्पर्धेत 10 सिक्स ठोकले होते. जी कमलिनी ही फलंदाजी सोबत उत्कृष्ट विकेटकिपर सुद्धा आहे. तसेच ती लेग स्पिन गोलंदाजी देखील करते. तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विविध वयोगट स्तरावर विकेटकिपिंग देखील केले. 16 वर्षीय कमलिनी सध्या चेन्नईतील सुपर किंग्स अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. ती भारताच्या अंडर-19 महिला संघाचा भाग आहे.
ऑक्शनमुळे जी कमलिनी झाली करोडपती :
तामिळनाडूची महिला क्रिकेटर जी कमलिनी हिने ऑक्शनसाठी तिची बेस प्राईज 10 लाख ठरवली होती. WPL 2025 मिनी ऑक्शनमध्ये कमलिनी जेव्हा ऑक्शन टेबलवर आली तेव्हा तिला खरेदी करण्यासाठी सर्व संघांची चढाओढ होती. अखेर कमलिनीवर मुंबई इंडियन्सने 1.60 कोटी बोली लावून तिला खरेदी केले.