WPL Auction 2023, Ashleigh Gardner, Natalie Sciver : महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL)ऑलराऊंडर खेळाडूंचे वर्चस्व दिसून येत आहे. कारण या लिलावात ऑलराऊंडर खेळाडूंवर कोटींची बोली लागली आहे. यामध्ये विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आता हे महिला खेळाडू कोण आहेत? त्यांना किती कोटींना विकत घेतले आहेत? व त्या कोणत्या संघात आहेत? हे जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


हे ही वाचा : स्मृती मंधानाला कोटींची बोली, RCB नं घेतलं ताफ्यात


 


कोण आहेत खेळाडू? 


मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये महिला क्रिकेटपटूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावात इंग्लंडची ऑलराऊंडर खेळाडू नताली सिव्हर (Natalie Sciver) आणि ऑस्ट्रेलियन संघाची ऑलराऊंडर अॅशले गार्डनर (Ashleigh Gardner)यांच्यावर पैशांचा वर्षाव करण्यात आला आहे. खरं तर, या दोन्ही खेळाडूंची मूळ किंमत 50 लाख रुपये होती, तर दोघांना तब्बल 3 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत खरेदी करण्यात आले होते. 


किती कोटींना खरेदी 


इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू नताली सिव्हरची (Natalie Sciver) मुळ किंमत 50 लाख रूपये होती. तिला खरेदी करण्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि यूपी वॉरियर्समध्ये (UP warriors) चुरशीची लढत झाली होती. मात्र मुंबई इंडियन्सने अखेरीस तिला  3.2 कोटी रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियन संघाची अष्टपैलू खेळाडू अॅशले गार्डनर (Ashleigh Gardner) हिची मुळ किंमत 50 लाख रुपये होती. मात्र तिला खरेदी करण्यासाठी  यूपी वॉरियर्स (UP warriors) आणि गुजरात जायंट्स (Gujrat giants) यांच्यात लढत झाली होती. अखेर गुजरात जायंट्सने तिला 3.20 कोटी रुपयांना विकत घेतले.


अ‍ॅशलेची टी20 कारकिर्द 


अ‍ॅशले गार्डनरच्या (Ashleigh Gardner) T20 क्रिकेट कारकिर्दीत तिने एकूण 68 सामने खेळताना 1069 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने 6 अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट 133.62 आहे. त्याचबरोबर तिने 68 सामन्यात एकूण 48 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान तिचा इकॉनॉमी रेट 6.23 इतका आहे.


नतालीची टी20 कारकिर्द 


नताली स्कायव्हरच्या (Natalie Sciver) T20 कारकिर्दीत तिने एकूण 104 सामने खेळताना 1999 धावा केल्या आहेत, ज्या दरम्यान तिने 50 अर्धशतके झळकावली आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत तिने एकूण 104 सामने खेळताना 78 विकेट घेतले आहेत. यादरम्यान तिचा इकॉनॉमी रेट 6.47 होता.


दरम्यान या दोन्ही ऑलराऊंडर खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला आहे. या पक्तीत अद्याप एकही भारतीय महिला खेळाडूला स्थान आहे. मात्र अजूनही लिलाव सुरु आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडूला संधी मिळते का हे पाहावे लागेल.