WPL Auction : वुमेंस प्रीमियर लीग (WPL) चं ऑक्शन 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने ऑक्शनसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी ऑक्शनमध्ये ऑक्शनरच्या भूमिकेत क्रिकेट प्रेमींना महिला दिसून येणार आहे. बोर्डाने 5 फ्रेचायझींना याची माहिती दिली आहे. यापूर्वी आयपीएलच्या ऑक्शनमध्ये ऑक्शनर म्हणून चाहत्यांनी ह्यूग एडमीड्स, रिचर्ड मॅडली आणि चारू शर्मा यांना पाहिलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वेबासाईटच्या माहितीनुसार, WPL 2023 प्लेअर ऑक्शनच्या नियमांप्रमाणे, 5 WPL फ्रेंचायझींनाना बीसीसीआयने माहिती दिली आहे की, मलिका आडवाणीच्या नेतृत्वाखाली ऑक्शनचं आयोजन होईल. मलिका आडवाणी मुंबईमध्ये राहणाऱ्या असून आर्ट इंडिया कंसल्टेंट्स फर्ममध्ये पार्टनर आणि मॉडर्न अँड कंटेम्पररी इंडियन आर्टमध्ये आर्ट करलेक्टर कंसलटेंट आहे.


एका टीममध्ये सहा विदेशी खेळाडू


बीसीसीआयने टीम्सना ही माहिती दिली आहे की, प्रत्येक टीममध्ये कमीत कमी 15 खेळाडू असतील आणि कमीत कमी 9 कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. टीम्सच्या पर्समध्ये एकूण 12 कोटी रूपये आहेत. कोणत्याही टीममध्ये केवळ 6 विदेशी खेळाडू असणं हा नियम आहे. यानुसार एकूण 409 खेळाडूंवर बोली लागेल, ज्यामध्ये 246 भारतीय खेळाडू आणि 163 विदेशी खेळाडू असणार आहेत. 


यामध्ये आठ खेळाडू सहयोगी देशांचे असणार आहेत. याशिवाय खेळाडू सेटमध्ये बोली लावतील. मार्की खेळाडू, फलंदाज, ऑलराउंडर, विकेटकीपर, वेगवान गोलंदाज, स्पिन गोलंदाज आणि इमर्जिंग प्लेयर असे यामध्ये सेट असणार आहेत.


बेस प्राईजमध्ये पाच विविध स्लॅब


ऑक्शन रजिस्टरमध्ये खेळाडूंच्या बेस प्राईजचे पाच वेगवेगळे स्लॅब असणार आहेत. यामध्ये रु.50 लाख, रु.40 लाख, रु.30 लाख, रु.20 लाख आणि रु.10 लाख. 24 खेळाडू टॉप ब्रॅकेटमध्ये आहेत. हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, एलिस पेरी, सोफी एक्लेस्टोन, सोफी डिव्हाईन आणि डिआंड्रा डॉटिन या खेळाडूंवर सर्वाधिक बेस प्राईज आहेत.


30 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईज 40 लाख रुपये ठेवलीये. बीसीसीआय लिलावादरम्यान प्रत्येक तासाला स्ट्रॅटेजी ब्रेकही देण्यात येणार आहे. प्रत्येक ब्रेक 10 मिनिटांचा असून फ्रँचायझी नियमित अंतराने त्यांच्या रणनीतीचा रिव्ह्यू करू शकतील.