WPL Auction 2023: एक रकमी पैसा हाती आला की बँकेत फिक्स डिपॉझिट (fixed deposit) म्हणजेच एफडी करण्याचा ट्रेण्ड आजही भारतीयांमध्ये दिसून येतो. एफडीवर (FD) अधिक व्याजदर देण्यास बँकांनी सुरुवात केली तेव्हापासून हा ट्रेण्ड सुरु झाला. एफडीवर मिळणारे मोठे रिटर्सन पाहता भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरचे (pooja vastrakar) वडील बंधनराम वस्त्राकार (bandhanram vastrakar) यांनीही तिला असाच काहीसा सल्ला दिला आहे. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये झालेल्या लिलावात पूजाला मिळालेली रक्कमेची तिने एफडी केली पाहिजे, असा सल्ला पूजाच्या वडिलांनी दिला आहे.


मुंबई इंडियन्सकडून खेळणार पूजा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला प्रीमियर लीगसाठी सोमवारी मुंबईमध्ये लिलाव पार पडला. त्यामध्ये बारतीय महिला क्रिकेटपटू पूजा वस्त्रकारला मुंबई इंडियन्सने (mumbai indians) 1.9 कोटी रुपयांना विकत घेतलं. वुमन्स आयपीएलच्या पहिल्या पर्वात पूजा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे.



वायफळ खर्च...


प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाने तिच्या वडिलांना म्हणजेच बंधनराम वस्त्राकार यांना 15 लाखांची गाडी गिफ्ट केली होती. मात्र बंधनराम यांना ही गाडी म्हणजे वायफळ खर्च वाटला होता. आता आयपीएलसाठी मोठी रक्कम मिळाल्यानंतर बंधनराम यांनी मुलीला मिळालेले पैसे एफडीमध्ये गुंतव असा सल्ला दिला आहे.


एफडीचे फायदे...


सामान्यपणे पैसे बँकेत ठेवण्यासंदर्भातील विषय निघतो तेव्हा एफडीचा आवर्जून उल्लेख केला जातो. कारण एफडीमध्ये गेलेली गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. तसेच या माध्यमातून निश्चित रिटर्नस मिळतात. त्याप्रमाणे व्याजावर टॅक्स सेव्हिंग, मनानुसार कालावधी निवडण्याची मूभा आणि सहज पैसे भरण्याची सुविधा याचप्रमाणे एफडीवर मिळणारं कर्ज यासारख्या गोष्टींमुळे लोकांचा एफडी करण्याकडे कल असतो. एफडीचे बरेच फायदे असल्याने अनेकांसाठी पैसे बाजूला काढून ठेवणं म्हणजे एफडी करणं असेच गणित आहे.


म्युचुअल फंडचा ट्रेण्ड वाढला पण...


अर्थात आज नक्कीच म्युचुअल फंडामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या आता वाढली आहे. मात्र आजही आई-वडिलांच्या पिढीतील लोकांशी गुंतवणूक विषयावर चर्चा केल्यास एफडीचा विषय आवर्जून निघतो. आजही या लोकांकडून तरुणांना एफडी करण्याचे सल्ले दिले जातात. अर्थात आजच्या डिजीटल जगामध्ये अनेक सुविधा हाताच्या बोटावर आल्या असल्या तरी पूर्वीपासून एफडी हा लोकांच्या पसंतीचा पर्याय राहिला आहे.


एफडीवर हे सुद्धा फायदे मिळतात


तुम्ही सुद्धा एफडी केली तर तुम्हाला त्याच्या मोबदल्यात कर्जही मिळू शकतो. तसेच बँकांमध्ये कर्जाच्या आधारावर ओव्हरड्राफ्ट सुविधाही मिळती. डिपॉझिट इनश्यूरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून एफडीवर इनश्यूरन्स कव्हरची सुविधाही मिळते.