Wrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...
Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना `दंगल गर्ल` गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही.
Wrestlers Protest News : दिल्लीतील जंतमंतरवर कुस्तीपटूंच्या संपाचा आज 15 व्या दिवस आहे. कुस्तीपटूंनी पदकं आणि पुरस्कार परत करण्याचं भाषा केली. दिल्ली पोलीस आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये बाचाबाचीच्या आरोप प्रत्यारोपवरुन राजकारण सुरु आहे. तरदुसरीकडे गुरुवारी (04 May 2023) एकीकडे दंगल गर्ल गीता फोगटला पोलिसांनी जंतरमंतरवर जाण्यास रोखलं.
अन् गीता फोटगला...
गीताने ट्वीटरवर दावा केला आहे की, ''तिला आणि तिच्या पतीला जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या माझ्या भावंडांना भेटण्यासाठी मी माझे पती पवन सरोहासोबत दिल्लीला जात होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हे अत्यंत दुःखद आहे.'' मात्र दिल्ली पोलिसांनी याबद्दल कुठलीही पुष्टी दिली नाही आहे. (wrestlers protest delhi police arrested geeta phogat return-medals-awards jantar mantar political reactions Trending Story)
पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये बाचाबाची
बुधवारी रात्री जंतरमंतरवर पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर कुस्तीपटू प्रचंड नाराज असून हे प्रकरण चिघळलं आहे. दिल्ली पोलिसांनी ठिय्या आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंना मारहाण केलाचा आरोप होतो आहे. या घटनेत काही कुस्तीपटूंच्या डोक्यालाही दुखापत झाल्याचं बोलं जातं आहे. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर केल्या नसल्याचं म्हटलं आहे. या घटनेत दिल्ली पोलीस दलातील दोन महिलांसह 5 जण जखमी झाले आहेत.
''...मग पदकांचं काय करणार?''
या घटनेच्या निषेधात विनेश फोगटने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकलेली सर्व पदकं परत करण्याचा निर्णय घेतला आहे. तर महावीर फोगट यांनीही द्रोणाचार्य पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान कुस्तीपटूंनी शनिवारी #arrestbrijbhushannow मोहिमेचा हॅशटॅग लॉन्च केला आहे. तर दुसरीकडे महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने कारवाई थांबवली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या या महिलेने केले आहेत.