ऋद्धीमान सहानं मोडला धोनीचा रेकॉर्ड
भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे.
केप टाऊन : भारतीय बॉलर्सच्या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली टेस्ट रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. पहिल्या इनिंगमध्ये ६५ रन्सची आघाडी मिळाल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिका १३० रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून मोहम्मद शमी-जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमारला प्रत्येकी २ विकेट घेण्यात यश आलं.
एकीकडे भारतीय बॉलर्सच्या कामगिरीचं कौतुक होत असतानाच भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहानं धोनीचं रेकॉर्ड मोडलं आहे. या मॅचमध्ये सहानं तब्बल १० कॅच पकडले आहेत. पहिल्या इनिंगमध्ये ५ आणि दुसऱ्या इनिंगमध्येही ५ कॅच पकडण्यात सहाला यश आलं. सहाच्या आधी एम.एस.धोनीच्या नावावर हा रेकॉर्ड होता. धोनीनं २०१४ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये ९ कॅच पकडले होते.
टेस्टमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे विकेट कीपर
खेळाडू | कॅच | विरुद्ध |
ऋद्धीमान सहा | १० | दक्षिण आफ्रिका |
एम.एस.धोनी | ९ | ऑस्ट्रेलिया |
नयन मोंगिया | ८ | दक्षिण आफ्रिका |
नयन मोंगिया | ८ | पाकिस्तान |
एम.एस.धोनी | ७ | ऑस्ट्रेलिया |