VIDEO: मैदानात पुन्हा ‘सुपरमॅन’ बनला साहा, करामती करत घेतली कॅच
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिस-या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात अनेक नाटकीय वळण बघायला मिळाले. खेळाच्या दुस-या दिवशी श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले होते.
नवी दिल्ली : टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या तिस-या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात अनेक नाटकीय वळण बघायला मिळाले. खेळाच्या दुस-या दिवशी श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानात उतरले होते.
श्रीलंकन खेळाडूंची नौटंकी
फिल्डींग दरम्यान श्रीलंकन खेळाडूंनी अनेकदा वायू प्रदुषणाची तक्रार केली. त्यांच्या या तक्रारींना कंटाळून विराट कोहली याने डाव घोषित केला. त्यानंतरही श्रीलंकन खेळाडू बॅटींगसाठीही मास्क घालून उतरले. श्रीलंकेकडून अॅंजेला मॅथ्यूज आणि कर्णधार दिनेश चांडीमलने शतकीय खेळी केली. या सामन्यादरम्यान विकेटकीपर ऋद्धीमान साहा याचाही सुपरमॅन अवतार बघायला मिळाला.
सुपरमॅन बनून कॅच
ऋद्धीमान साहाने श्रीलंके विरूद्ध सदीरा समरविक्रमाची कॅच जवळपास सुपरमॅन बनून घेतली. सोमवारी साहाने त्याचे सुपरमॅच स्किल्स दाखवत फिरोजशाह कोटला मैदानावर सदीरा समरविक्रमाला आऊट करण्यासाठी एरोबॅटीक कॅच घेतली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात शेवटची आणि तिसरी टेस्ट सुरू होती. ईशांत शर्मा १३७वा ओव्हर टाकत होता. बॉल साहापासून बराच दूर होता, पण साहाने आपल्या शरिराला जबरदस्त डाय टाकत बॉलपर्यंत पोहोचवलं आणि एक अशक्य कॅच शक्य करून दाखवली.
१११ रन्सवर मॅथ्यूज आऊट
मॅथ्यूज १११ रन्स करून आऊट झाला. तिस-या दिवसाचा खेल संपेपर्यंत श्रीलंकाने ९ विकेट गमावून ३५६ रन्स केले होते. आतापर्यंत मॅथ्यूजच्या खराब प्रदर्शनाची चर्चा सुरू होती. पण मॅथ्यूजने दिनेश चांडीमलसोबत १८१ रन्सची भागीदारी केली.