ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सध्या अशेस सिरीज सुरु आहे. अॅडलेड डे-नाईट कसोटीत अंपायरच्या चुकीच्या निर्णयाची एक घटना पाहायला मिळाली. त्यामुळे इंग्लंड संघाला काही काळ आनंद मिळाला मात्र त्यांचा हा आनंद काही क्षणंच टिकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी 17 डिसेंबर डे-नाईट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या 2 बाद 238 अशी होती. यावेळी मार्नस लॅबुशेन 102 धावांवर करून खेळत होता. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने लबुशेनला विकेटकीपर जोस बटलरकडे कॅच आऊट केलं. झेल अगदी स्पष्ट होते, त्यामुळे फलंदाजही पॅव्हेलियनमध्ये परताला. यावेळी इंग्लंडच्या संघाने जल्लोष करायला सुरुवात केली.


त्यानंतर दुसऱ्याच क्षणी थर्ड अंपायरने रिव्ह्यूमध्ये पाहिलं की, बॉलर रॉबिन्सनचा क्रीझच्या बाहेर पाय जात होता. म्हणजेच तो नो-बॉल होता, जो मैदानात असलेल्या अंपायर्सनी पाहिला नाही. 


मैदानात असलेल्या अंपायर्सची ही चूक थर्ड अंपायरने ताबडतोब सुधारली आणि मार्नस लॅबुशेनला नो-बॉल म्हणत परत बोलावलं. हे सर्व पाहून इंग्लिश खेळाडू खेळांडूंच्या चेहऱ्यावरील हसू काही काळात मावळलं. तर ऑस्ट्रेलियन डगआऊटमध्ये मात्र सगळे आनंदी झाले. 


मात्र, लाबुसेनचा हा आनंदही फार काळ टिकला नाही. पुढच्या ओव्हरमध्ये आलेल्या ऑली रॉबिन्सनने याचा बदला घेत लॅबुशेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवून दिलं. लाबुशेन त्याच्या 103 रन्सवर करून एलबीडब्ल्यू आऊट झाला. यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाने डीआरएसही घेतला होता, मात्र लाइफ सपोर्ट मिळाल्यानंतरही लबुशेनला फायदा घेता आला नाही. 


गेल्या वर्षी झाले नियमांमध्ये बदल


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गेल्या वर्षीच नो बॉलशी संबंधित नियमांमध्ये काही मोठे बदल केले होते. यामध्ये आतापासून मैदानावरील अंपायरसह थर्ड अंपायरही नो बॉलवर लक्ष ठेवतील. असा निर्णयही घेण्यात आला. म्हणजेच फील्ड अंपायरची चूक असेल तर तो टीव्हीवर पाहून थर्ड अंपायरही नो बॉल देऊ शकतात.