मुंबई: टीम इंडियाचे खेळाडू वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला पोहोचले आहेत. तिथे सध्या खेळाडू आपला सराव करत आहेत. 18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धचा अंतिम सामन्या टीम इंडियाला जिंकणं महत्त्वाचं आहे. या सामन्यावर सर्वांच्या नजरा आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संदर्भात टीम इंडियाला महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. भारत आणि न्यूझीलंडची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात 18 ते 22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे सामना होणार आहे. आगरकर यांच्या मते,  'टीम इंडियाने या सामन्याची सुरुवात तीन वेगवान गोलंदाजांच्या मदतीने करायला हवी. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांनी या सामन्याची सुरुवात करायला हवी. शमी आणि बुमराह भारतीय कसोटी संघाच्या गोलंदाजीत प्रथम क्रमांकाचे गोलंदाज आहेत.'


वेगवान गोलंदाज यावेळी संघाकडून चांगली भूमिका निभावतील असा विश्वास देखील आगरकर यांनी व्यक्त केला आहे. मोहम्मद शमी तर कसोटी सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचं आगरकर म्हणाले. याशिवाय इशांत शर्मा देखील उत्तम खेळतो असं म्हणाले आहेत. 


तिथे 18 ते 22 दरम्यान हवामानाची काय स्थिती असेल याचा सध्या आपण अंदाज लावू शकत नाही. पण वेगवान गोलंदाज तिथल्या पिचवर चांगलं खेळू शकतात असा विश्वास आगरकर यांना आहे. सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्यायला हवं असाही सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. 


जून 18 ते 22 दरम्यान होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. ड्युक बॉलनं हा सामना खेळला जाणार आहे. तर या सामन्यानंतर टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून खेळायची आहे.