मुंबई: वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्या दरम्यान टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू जखमी झाला. त्याला हाताला झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियाची चिंता काहीशी वाढली आहे. न्यूझीलंड विरुद्ध अंतिम सामन्या दरम्यान बॉलनं टीम इंडियाच्या बॉलरचा घात केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू ईशांत शर्मा आपल्या बॉलमुळे जखमी झाला आहे. ईशांतच्या 2 बोटांना दुखापत झाली आहे. त्यावर सर्जरी करण्यात आली असून बोटांना टाके घालण्यात आले आहेत. इंग्लंड सीरिजआधी ईशांत पूर्णपणे फिट असेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 


ईशांत शर्माला न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात दुखापत


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ईशांतला त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या आणि चौथ्या बोटावर टाके पडले आहेत. मात्र, ईशांतची दुखापत फारशी गंभीर नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सध्या सहा आठवडे शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत तो इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी फिट असेल अशी आशा व्यक्त केली आहे.


बोटांना दुखापत झाल्यामुळे ईशांत आता इंग्लंड विरुद्ध सीरिजसाठी सराव करू शकणार नाही. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज खेळवली जाणार आहे. त्यामुळे ईशांत शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणार की नाही याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सर्वजण ईशांत बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत आहेत.


टीम: रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्र अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धिमान साहा