मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिलाच दिवस पावसानं खराब केला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ स्थगित करावा लागला आहे. त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली. तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आधीच आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले होते. अजून टॉस होणं बाकी आहे त्यामुळे विराट कोहली पुन्हा आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो का असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात टॉसआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांच्या मते कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. टॉस होण्याआधी अशा प्रकारे बदल करता येऊ शकतो. टॉस झाला म्हणजे खेळाला सुरुवात झाली असं समजलं जातं. 


पावसामुळे पिचवरची स्थिती बदलली असून आता टीममध्ये देखील बदल करणं आवश्यक असणार आहे. टीम इंडियामध्ये आता कोहली 3 ऐवजी 4 वेगवान गोलंदाजांना संधी देऊ शकतो. कोहली आणि मॅनेजमेंट याबाबत विचार करतील आणि निर्णय घेतील असंही गावस्कर म्हणाले आहेत. 


पावसामुळे पहिल्या दिवशी टॉस होऊ शकला नाही. पहिल्या सत्रानंतरही पाऊस असल्यामुळे सामना दुसऱ्या सत्रात सुरू करायचं ठरलं मात्र पावसानं व्यत्यय आणला आणि सगळाच घोळ झाला. पहिल्या दिवशीचा सामना स्थगित करावा लागला आहे.