मुंबई: ज्या क्षणाची संपूर्ण जग आतूरतेनं वाट पाहात होतं अखेर तो क्षण आज आला. भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना आजपासून सुरू होणार आहे. इंग्लंडच्या साउथेप्टम इथे हा सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार आहेत. न्यूझीलंड संघासमोर टिकण्यासाठी विराट सेना कशी योजना आखणार याकडे संपूर्ण जगाचं लक्षं लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन वेगळ्या शैलीचे कर्णधार आज आमने-सामने
आक्रमक विराट कोहली आणि शांत संयमी कॅप्टन केन विल्यमसन आज मैदानात आमनेसामने भिडणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला आजपासून दुपारी 3 वाजल्यापासून हा सामना सुरू होणार आहे. दुसरीकडे या सामन्यावर खराब हवामानाचं सावट असणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये टीम इंडिय़ाच्या बॉलर्सना जास्त मेहनत आणि आपल्या कौशल्याचा वापर करावा लागणार आहे. 


सलामीला रोहित शर्माबरोबर शुभमन गिल या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे. तर सध्यात फॉर्मात असलेल्या ऋषभ पंतही टीमचा भाग असणार आहे. भारतीय संघात जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजाना संधी देण्यात आली असून रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन आश्विन या दोन्ही फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.



विराटसेनेचे 11 शिलेदार
विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांचा समावेश करण्यात आला आहे.