WTC Final 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया ( AUS vs IND ) यांच्यामध्ये सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना सुरु आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना सुरु असून आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. दोन्ही टीममध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) खिताबासाठी संघर्ष सुरु आहे. अशातच सामन्याच्या पहिल्या दिवशी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची ( Rohit Sharma ) पत्नी रितीका सजहेद ( Ritika Sajdeh ) दिसून आल्या. यावेळी चाहत्यांनी अखेर दोघींमधील वाद संपुष्टात आला असल्याचं म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून रितिका ( Ritika Sajdeh ) आणि अनुष्का ( Anushka Sharma ) यांच्या दोघींमध्ये काही बिनसलं असल्याची चर्चा होती. 2019 पासून रोहितने कोहली आणि अनुष्काला इन्स्टावर अनफॉलोही केलं होतं. 4 वर्षांपूर्वी अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेह ( Ritika Sajdeh ) यांच्यात वाद असल्याचा अफवा उठल्या होत्या. केवळ या दोघी नव्हे तर विराट ( Virat Kohli ) आणि रोहित यांच्यामध्येही भांडण असल्याचं समोर आलं होतं.


2019 च्या वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. दरम्यान या पराभवानंतर टीम इंडियाचे वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं. यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या. दरम्यान यानंतर अनुष्का शर्मा आणि रितिका सजदेह कधीच एकत्र दिसल्या नव्हत्या. मात्र कालच्या सामन्यात दोघी एकत्र असल्याचं चित्र पुन्हा दिसून आलं. 


दरम्यान आता या दोघींनी एकत्र पाहून चाहते मात्र फार खूश आहेत. सोशल मीडियावर या दोघींची फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. अनुष्का-रितिका सोबत यावेळी शार्दुल ठाकूरची पत्नीही स्टँडमध्ये उपस्थित दिसली. नुकतंच शार्दूल ठाकूर आणि मिताली पारूळकर लग्नबंधनात अडकले होते.


सामन्यावर ऑस्ट्रेलियाची पकड


बुधवारपासून सुरु झालेल्या या सामन्यात कांगारूंची मजबूत पकड दिसून आली. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र स्टिव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेड यांच्या जोडीने भारतीय गोलंदाजांनी अक्षरशः धुतलं. मात्र सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारचीय गोलंदाजांनी कमबॅक करत कांगारूंना बॅकफूटवर ढकललंय.