मुंबई: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात छोट्या चुकांमुळे टीम इंडियाच्या हातून विजय निसटला. दुसऱ्या डावात 170 धावांवर टीम इंडिया ऑलआऊट झाली. सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड संघाला एकूण 139 धावांचं टार्गेट होतं. दोन्ही डावांमध्ये टीम इंडिया 139 धावांनी आघाडीवर असताना किवीच्या फलंदाजांनी हा सामना 8 गडी राखून जिंकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात टीम इंडियातील चेतेश्वर पुजाराची एक चूक खूप महागात पडली आणि हातून सामना निसटला. अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर सामना असताना नेमका पुजाराने कॅच सोडला. 31 व्या ओव्हर दरम्यान बुमराहने टेलरला बॉल टाकला. हा बॉल त्याने जोरात टोलवला. कॅच पकडण्याच्या तयारीत असलेल्या पुजाराच्या हातून बॉल निसटसला.






टेलर आऊट होण्यापासून पुजाराच्या एका चुकीमुळे वाचला. त्यावेळी न्यूझीलंडचा स्कोअर 84 धावा होता. जर तो कॅच सोडला नसता तर कदाचित चित्र वेगळं असू शकलं असतं. चेतेश्वर पुजाराने कॅस सोडल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर खूप संताप व्यक्त केला.


 केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा न्यूझीलंड संघ टेस्ट क्रिकटची चॅम्पियन ठरला आहे. कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरच्या झुंजार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने भारतावर 8 विकेट राखून मात केली आणि टेस्ट चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.