Ajinkya Rahane In WTC Final : भारतीय क्रिकेट संघापासून साधारण वर्षभर दूर असणाऱ्या खेळाडू अजिंक्य रहाणे यानं यंदाच्या आयपीएलमध्ये धुमाकूळ घातला आहे. संयमी आणि वेळ पडल्यास आक्रमक खेळाचं प्रदर्शन करणाऱ्या रहाणेनं (CSK) चेन्नईच्या संघानं आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला आहे. असं असतानाच यशाच्या शिखरावर धीम्या गतीनं का असेना पण, पुढे जाणाऱ्या अजिंक्यला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही बातमी म्हणजे, WTC Final 2023 मध्ये भारतीय संघात त्याची निवड होण्याबाबतची. संघात मधल्या फळीचा फलंदाज म्हणून रहाणेला पुनरागमन करण्याची संधी मिळण ही त्याच्या दृष्टीनंही अतिशय महत्वाची बाब. मागील काही दिवसांपासूनच्या क्रिकेटमधील कामगिरीनं अजिंक्यनं निवड समितीवर छाप सोडली. पण, त्याची निवड होण्यामागे निवड समितीच नव्हे, तर आणखीही काही व्यक्तींचं  योगदान असल्याची मोठी बातमी नुकतीच समोर आलीये. 


'ते' दोघं....


भारतीय संघाला अनेकदा संकटातून तारणाऱ्या आणि वेळोवेळी योग्य दिशेला नेणाऱ्या दोन महत्त्वाच्या व्यक्तींनी अजिंक्यच्या पुनरागमनासाठी प्रयत्न केले. त्यातलं एक नाव म्हणजे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणारा राहुल द्रविड आणि दुसरं नाव म्हणजे संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी. क्रिकेट आणि क्रीजाविषयक वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या एका संकेतस्थळानं यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली. 


बीबीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यानं धोनीला फोन केला नसता तर हे सर्व शक्यच झालं नसतं. धोनीच्या सांगण्यावरूनच रहाणेला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाल्याचं म्हटलं जात आहे. 


BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर अजिंक्य कायमच त्यांच्या नजरेत होता. त्याच्याकडे इंग्लंडमध्ये खेळल्याचाही अनुभव होता. पण, दो एक-दीड वर्षापासून संघात नवहता त्यामुळं त्याच्या रणजीतील कामगिरीचाच अंदाज घेण्यात आला. ज्यामुळंच द्रविडनं त्याचं मत बनवण्याआधी धोनीचंही मत विचारात घेतलं. (Mahendra singh Dhoni) 


हेसुद्धा वाचा : IPL 2023 : चाहत्यानं लाख सांगूनही संजू ऐकलाच नाही, फोन उचलला आणि... त्याच्याकडून ही अपेक्षाच नव्हती! 


रहाणेला अय्यरच्या जागी संघात घेण्यापूर्वी सध्या तो नेट्समध्ये, मैदाना कशी कामगिरी करत आहे याची विचारणा करण्यासाठी (Rahul Dravid) द्रविडनं माहिला संपर्क साधला. जिथं धोनीनं त्याच्या फलंदाजीसंदर्भातील माहिती दिली ज्यानंतर रहाणेच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. 


दरम्यान, तिथं धोनी आणि द्रविडचं नाव पुढे येत असतानाच इथे द्रविड आणि रोहित शर्माच्या प्रयत्नांमुळं अजिंक्यला संघात स्थान मिळाल्याची माहितीही समोर आली. थोडक्यात योगदान अनेकांनीच दिलं आणि अजिंक्य संघात आला. आपल्या सोबत खेळणाऱ्या मंडळींचा हाच विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी खांद्यांवर घेत आता अजिंक्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी मैदानात येणार आहे. त्यामुळं या खास इनिंगसाठी त्याला ALL THE BEST!!!